‘ललित २०५’ आणि ‘छत्रीवाली’मध्ये उभारली गुढी

‘छत्रीवाली’ मालिकेतही गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याचं पाहायला मिळणार आहे. विक्रम आणि मधुरा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्यानं यंदा गुढी उभारण्याचा मान गायकवाड कुटुंबानं मधुराला दिला.

  • ‘ललित २०५’ आणि ‘छत्रीवाली’मध्ये उभारली गुढी
  • ‘ललित २०५’ आणि ‘छत्रीवाली’मध्ये उभारली गुढी
  • ‘ललित २०५’ आणि ‘छत्रीवाली’मध्ये उभारली गुढी
SHARE

एखादा मराठमोळा सण आला की, मराठी सिनेमांपासून मालिकांपर्यंत सगळीकडं त्या सणाचं वातावरण असतं. आता गुढीपाडवा जवळ आल्यानं सर्वांनाच आता त्याचे वेध लागले आहेत. छोट्या पडद्यावर सुरू असलेल्या ‘ललित २०५’ आणि ‘छत्रीवाली’ या मालिकांमध्येही गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


सेटवर खरंखुरं सेलिब्रेशन 

स्टार प्रवाहवर प्रसारीत होणाऱ्या ‘ललित २०५’ आणि ‘छत्रीवाली’ या मालिकांमध्ये पाडव्याचा गोडवा पाहायला मिळणार आहे. सहकुटुंब गुढी उभारत या दोन्ही मालिकेतील कलाकारांनी मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. ‘ललित २०५’च्या राजाध्यक्ष कुटुंबासाठी हा सण आणि येणारं नवं वर्ष खऱ्या अर्थानं निर्णायक ठरणार आहे. आजवर नील, भैरवी आणि सुमित्रा आजीनं मिळून प्रत्येक संकटाचा सामना केला आहे. आता मात्र संपूर्ण राजाध्यक्ष कुटुंब एकत्र आलं आहे. त्यामुळं आनंदाचे आणि सुखाचे क्षण पुन्हा परत येतील याचा विश्वास संपूर्ण कुटुंबाला आहे. यानिमित्तानं राजाध्यक्षांच्या सुनांनी खास गोडाचा बेतही केल्यामुळं शूटिंगच्या निमित्तानं सेटवर खरंखुरं सेलिब्रेशन करण्यात आलं.


गुढीचा मान मधुराला

‘छत्रीवाली’ मालिकेतही गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याचं पाहायला मिळणार आहे. विक्रम आणि मधुरा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्यानं यंदा गुढी उभारण्याचा मान गायकवाड कुटुंबानं मधुराला दिला. पारंपरिक पद्धतीनं गुढीची पूजा करत मधुरानं या सणाचा गोडवा वाढवला. या मालिकेत विक्रमची भूमिका साकारणाऱ्या संकेत पाठकनं यानिमित्तानं गुढीपाडव्याची एक खास आठवण शेअर केली. 


जुन्या आठवणींना उजाळा 

संकेत म्हणाला की, मी मुळचा नाशिकचा आहे. माझ्या घरी दरवर्षी जल्लोषात गुढी उभारली जाते. लहानपणी मी माझी स्वत:ची वेगळी गुढी उभारायचो. गुढीचे छोटे दागिने, छोटी साडी याचं विशेष कौतुक वाटायचं. आता शूटिंगमुळं घरी गुढी उभारण्यासाठी जाणं शक्य होत नाही, पण सेटवरच्या या सेलिब्रेशनमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याची भावना संकेतनं व्यक्त केली.हेही वाचा -

बघा, मंगेश-तेजश्रीचा गुढीपाडवा!

खलनायकी भूमिकेत सुप्रित निकम
संबंधित विषय
ताज्या बातम्या