बघा, मंगेश-तेजश्रीचा गुढीपाडवा!

एखादा मराठमोळा सण आला की, त्या टीमच्या वतीनं तो सण साजरा करण्याचा ट्रेंड रुजला आहे. याच ट्रेंडला अनुसरून अभिनेता मंगेश देसाई आणि तेजश्री प्रधान यांनी एकत्र येत गुढीपाडवा हा सण साजरा केला.

  • बघा, मंगेश-तेजश्रीचा गुढीपाडवा!
  • बघा, मंगेश-तेजश्रीचा गुढीपाडवा!
  • बघा, मंगेश-तेजश्रीचा गुढीपाडवा!
  • बघा, मंगेश-तेजश्रीचा गुढीपाडवा!
  • बघा, मंगेश-तेजश्रीचा गुढीपाडवा!
  • बघा, मंगेश-तेजश्रीचा गुढीपाडवा!
  • बघा, मंगेश-तेजश्रीचा गुढीपाडवा!
SHARE

अलीकडच्या काळात एखादा सिनेमा प्रदर्शित होणार असला आणि त्याच दरम्यान एखादा मराठमोळा सण आला की, त्या टीमच्या वतीनं तो सण साजरा करण्याचा ट्रेंड रुजला आहे. याच ट्रेंडला अनुसरून अभिनेता मंगेश देसाई आणि तेजश्री प्रधान यांनी एकत्र येत गुढीपाडवा हा सण साजरा केला.


हिंदू नववर्षाची सुरुवात

खरं तर गुढीपाडवा ६ एप्रिलला आहे, पण मंगेश आणि तेजश्री यांनी अगोदरच गुढी उभारून हिंदू नववर्षाची सुरुवात केली. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त आणि हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजेच 'गुढीपाडवा'. या शुभदिनी अनेक चांगल्या गोष्टींची सुरुवात केली जाते. या दिवसाचं औचित्य साधत 'जजमेंट' या मराठी चित्रपटाच्या संपूर्ण टीमनं गुढीपाडवा साजरा करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली. २४ मे रोजी प्रदर्शित

मंगेश देसाई, तेजश्री प्रधान आणि माधव अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा थरारक चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट एक वेगळा विषय आणि अनुभव देणारा असणार आहे. चित्रपटाची कथा गुलदस्त्यात ठेवण्यात आली असली तरी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरवरून हा चित्रपट नक्कीच एक रोमांचकारी अनुभव देणारा असेल याची जाणीव होते. या निमित्तानं मंगेश आणि तेजश्री प्रथमच एकत्र झळकणार आहेत.  समीर सुर्वे दिग्दर्शित

या चित्रपटात 'श्री पार्टनर' फेम श्वेता पगार हिचीसुद्धा महत्वाची भूमिका आहे. सोबत सतीश सलागरे, किशोरी अंबिये, महेंद्र तेरेदेसाई, शलाका आपटे, विजय भानू, शिल्पा गांधी, प्रतीक देशमुख, निलेश देशपांडे, बाल कलाकार चैत्रा भुजबळ आणि नुमायारा खान आदी कलाकार सुद्धा आहेत. निवृत्त सनदी अधिकारी आणि पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या 'ऋण' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट समीर रमेश सुर्वे यांनी दिग्दर्शित केला असून डॉ. प्रल्हाद खंदारे आणि हर्षमोहन कृष्णात्रेय यांनी निर्मिला आहे.
हेही वाचा -

रविवारी उर्मिला मातोंडकर, हार्दिक पटेल करणार संयुक्त प्रचार

कर्जाचे हप्ते घटणार, RBI ने केली व्याजदर कपातसंबंधित विषय
ताज्या बातम्या