Advertisement

'आपल्या माणसा'सोबत खाना और गाना!


'आपल्या माणसा'सोबत खाना और गाना!
SHARES

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम सुरू झाल्यापासूनच यातील सेलेब्रिटी गायकांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. या कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टन्सना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक सुखद धक्का दिला आहे. येत्या सोमवार, मंगळवार आणि बुधवारच्या भागामध्ये देखील असंच काहीसं घडणार आहे.


'आपला मानूस' 'सूर नवा ध्यास नवा'च्या मंचावर

'आपला मानूस' हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या निमित्ताने चित्रपटाची संपूर्ण टीम 'सूर नवा ध्यास नवा'च्या मंचावर आली. या विशेष भागामध्ये नानांच्या 'आपला मानूस' गाणी स्पर्धक सादर करणार आहेत.

नाना या कार्यक्रमाला उपस्थित राहणार म्हटल्यावर सुरांबरोबर गप्पांची मैफल ही रंगणारच! या क्षणी नानांबरोबर इरावती हर्षे, सुमित राघवन आणि चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे उपस्थित असतील. यावेळी नानांनी अनेक आठवणी प्रेक्षकांबोरबर शेअर केल्या आहेत. जर तुम्हाला ही सुरांची आणि गप्पांची मैफील अनुभवायची असेल, तर 'सूर नवा ध्यास नवा'चा 'आपला मानूस' विशेष भाग येत्या सोमवारी ५ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार.


'आज काय स्पेशल'मध्ये काय?

याआधी नाना पाटेकर यांना आपण एक अभिनेता म्हणून ओळखत होतो. मात्र, कलर्स मराठीवरील 'आज काय स्पेशल' या कार्यक्रमामधून नाना एक उत्कृष्ट पदार्थ बनवताना दिसणार आहे. 'आपला मानूस' चित्रपटाच्या निमित्ताने 'आज काय स्पेशल' कार्यक्रमामध्येही या टीमने हजेरी लावली. नाना पाटेकर या सिनेमाबद्दल गप्पा तर मारणार आहेतच, पण त्याचबरोबर खमंग डिश बनवताना देखील दिसणार आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा