छोटा राजनसाठी मराठी ग्लॅमरचा तडका!

Mumbai
छोटा राजनसाठी मराठी ग्लॅमरचा तडका!
छोटा राजनसाठी मराठी ग्लॅमरचा तडका!
छोटा राजनसाठी मराठी ग्लॅमरचा तडका!
छोटा राजनसाठी मराठी ग्लॅमरचा तडका!
See all
मुंबई  -  

मुंबई - मराठीच्या पडद्यावर ‘राजन’ हा चित्रपट गाजणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडेच सुरू आहे. 'छोटा राजन'च्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात संतोष जुवेकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे.

 

'राजन' चित्रपटाची नायिका कोण या चर्चेला उधाण आलं होतं. बऱ्याच दिवासांपासून रंगत असलेल्या या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. कारण दुर्गा पाटील हा नवा चेहरा आपल्याला संतोष जुवेकरसोबत चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अवघ्या 19 वर्षांची ही अभिनेत्री राजन चित्रपटातील ‘राणी’ या भूमिकेद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहे.

 

दुर्गा सध्या एसवायमध्ये शिकत असून ती रग्बी या खेळात राष्ट्रीय खेळाडू आहे. तसेच तिने मार्शल आर्टसमध्ये सुवर्ण पदकही पटकावले आहे. पण या भूमिकेसाठी तिला तिच्या देहबोली आणि भाषाशैलीवर नक्कीच खूप मेहनत घ्यावी लागली. चित्रपटातील राणी या भूमिकेसाठी दिग्दर्शक भरत सुनंदा यांना कठोर, प्रेमळ आणि नाजूक अशी मुलगी हवी होती. मात्र दुर्गा एक खेळाडू असल्यामुळे या भूमिकेच्या सरावासाठी तिला सहा महिन्यांचा कालावधी लागला.

 

थरारक गँगवॉर असलेल्या या कथेतून हळूवारपणे फुलत जाणारी प्रेमकथा या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे निमार्ती दर्शना भडांगे असून सह-निमार्ती दीप्ती श्रीपत आहेत. दिग्दर्शक भरत सुनंदा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रिधम मुव्ही प्रेजेंटसोबत मुदिता फिल्म्स प्रस्तुत राजन हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.