Advertisement

ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांची प्रकृती चिंताजनक!

ष्ठ गीतकार-संगीतकार यशवंत देव यांची प्रकृती चिंताजनक आहे. दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात १० आॅक्टोबरपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांच्या प्रकृतीत अपेक्षेप्रमाणे सुधारणा होत नसल्याचं सुश्रुषाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांची प्रकृती चिंताजनक!
SHARES

मागील काही दिवसांपासून न्युमोनियाने आजारी असलेले ज्येष्ठ गीतकार-संगीतकार यशवंत देव यांची प्रकृती चिंताजनक आहे. दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात १० आॅक्टोबरपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांच्या प्रकृतीत अपेक्षेप्रमाणे सुधारणा होत नसल्याचं सुश्रुषाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये नमूद करण्यात आलं आहे.


चिकन गुनिया झाल्याचं निदान

रुग्णालयात दाखल करताना तपासणीदरम्यान देव यांना चिकन गुनिया झाल्याचं निदान करण्यात आलं. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचं आढळल्यानं त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं. आता न्युमोनियानं ग्रस्त झाल्यानं त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. तज्ज्ञ डॅाक्टरांची टिम त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, त्यांच्याकडून उपचारांचे पूर्ण प्रयत्न केले जात आहेत.


विविध प्रकारच्या संगीतरचना केल्या

यशवंत देव यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत विविध प्रकारच्या संगीतरचना केल्या. लता मंगेशकरांपासून सुमन कल्याणपूरांपर्यंत आणि आजच्या काळातील काही आघाडीच्या तरुण गायक-गायिकांनी देव यांच्यासाठी पार्श्वगायन केलं आहे. ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे...’, ‘तू नजरेने हो म्हटले...’, ‘प्रिया आज माझी नसे साथ द्याया...’, ‘श्रीरामाचे चरण धरावे...’ यांसारख्या बऱ्याच गीतरचना देव यांनी आपल्या संगीतामुळे अजरामर केल्या आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा