Advertisement

'बापजन्म' सिनेमाची फॉरेन टूर!


'बापजन्म' सिनेमाची फॉरेन टूर!
SHARES

मराठी सिनेमाचा दर्जा उंचावतोय हे काही वेगळं सांगायला नको. नवनवे विषय घेऊन सध्या मराठी सिनेमा भारतातच नाही तर भारताबाहेरही आपलं स्थान निर्माण करू लागला आहे. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित 'बापजन्म' हा सिनेमाही आता भारताबाहेर प्रदर्शित होणार आहे. अमेरिका, युके, स्वीडन, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर या देशांमध्ये या चित्रपटाचे शो दाखविले जाणार आहेत.



‘बापजन्म’ची कथा, पटकथा आणि संहिता निपुण धर्माधिकारीनेच लिहिली आहे. निपुणने याआधी उमेश कुलकर्णी यांच्या ‘हायवे’ या चित्रपटात काम केले असून तो मराठी रंगभूमीवरील व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही नाटकांमध्ये दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. सचिन खेडेकर आणि पुष्कराज चिरपूटकर यांच्यासह ‘बापजन्म’ चित्रपटात शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन आणि आकाश खुराणा यांच्या भूमिका आहेत. बापजन्मच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठी सिनेमा भारताबाहेर पोहचला असं म्हणायला हरकत नाही!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा