'चि. व चि. सौ. कां'चा टीजर प्रदर्शित

 Mumbai
'चि. व चि. सौ. कां'चा टीजर प्रदर्शित

काही दिवसांपूर्वीच 'चि. व चि. सौ. कां.' ह्या अगदी वेगळं नाव असलेल्या सिनेमाचं पोस्टर सगळ्यांनीच पाहिलं होतं. नावावरूनच ह्या सिनेमात नक्की काय पाहायला मिळेल ह्याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. त्या प्रश्नाचं थोडं का होईना पण उत्तर मिळालंय. नुकताच ह्या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांसमोर आलाय.

जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता ललित प्रभाकर यात ‘चिरंजीव’ उर्फ सोलारपुत्राची भूमिका साकारत आहे. तर अग्निहोत्र या मालिकेतून अभिनयाची सुरुवात करणारी मृण्मयी गोडबोले यात ‘चि. सौ. कां.’ उर्फ व्हेज कन्येची भूमिका करणार आहे.

ललित प्रभाकर ह्याची सौरयंत्र बनवण्याची कंपनी असते तर मृण्मयी प्राण्यांची डॉक्टर. अरेंज मॅरेजसाठी हे दोघं समोरासमोर येतात आणि मग काय धमाल उडते या विषयावर हा सिनेमा आधारित आहे. आता त्यांचं लग्न एकमेकांशी होत का? हे तर आपल्याला सिनेमा पाहिल्यावरच समजेल. निखिल साने निर्मित ‘चि. व. चि. सौ. कां.’ या चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी हे आहेत आणि परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी या चित्रपटाचे लिखाण केले आहे. हा चित्रपट येत्या १९ मे रोजी प्रदर्शित होत आहे.
Loading Comments