F. U. चं टीजर रिलीज

  Mumbai
  F. U. चं टीजर रिलीज
  मुंबई  -  

  काही दिवसांपूर्वी खुद्द सलमान खानने आकाश ठोसरच्या अपकमिंग सिनेमाचं टीजर ट्विट केलं होतं. त्यानंतर सर्वांनाच त्या सिनेमाची उत्सुकता लागून राहिली होती. आता ह्या सिनेमाचा दुसरा टीजर पण लॉन्च करण्यात आलाय. ज्यात सिनेमा कसा आणि कशावर असेल ह्याची थोडी झलक पाहायला मिळतेय.

  कॉलेजचे दिवस, त्या दिवसांमध्ये केलेली धम्माल मस्ती आणि अर्थात मारामारी हे सगळं काही ह्या सिनेमात पाहायला मिळणार आहे. म्हणजेच  कॉलेजमध्ये एक्स्ट्रा क्लासेसच्या नावाखाली मजामस्ती करणारी तरुणाई यात दिसणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘एफयू’ चित्रपट तरुणाईला लक्षात घेऊन बनवल्याचे दिसून येते. कॉलेजमधील एका रॉक बॅण्डमध्ये गाणाऱ्या आकाशचा वेस्टर्न लूक यात दिसतोय.  बोल्ड लूकमधील संस्कृती बालगुडेची झलकही यात दाखविण्यात आलीय.

  ह्या सिनेमात सत्या मांजरेकर ही झळकणार आहे. त्याचे रॉक बॅण्डमधला गिटारिस्ट आणि बॉक्सर असे दोन लूक यात दाखविण्यात आले आहेत. सचिन खेडेकर, शरद पोंक्षे आणि बोमन इराणी हे तिन्ही कलाकार वेगवेगळ्या विचारसरणी असलेल्या पालकांच्या भूमिकेत दिसतात. सैराटमध्ये आपण जसं आकाश ला पाहिलंय अगदी त्या उलट ह्यात तो आपल्याला पहायला मिळणार आहे. फुल रॉकिंग स्टाईलमध्ये गाणारा आकाश भारी दिसतोय. पण हा टीजर प्रेक्षकांना किती आवडेल ह्याबाबत मात्र शंका आहे. पूर्ण टीजरमध्ये आकाश फक्त एकच वाक्य बोलतोय आणि ते ही डब केलेलं. मात्र आकाशचा लूक जसा रॉकिंग आहे तसा हा टीजर वाटत नाही.


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.