स्त्री मनाचा वेध घेणारा 'गर्भ' 17 मार्चला चित्रपटगृहात

  Andheri
  स्त्री मनाचा वेध घेणारा 'गर्भ' 17 मार्चला चित्रपटगृहात
  मुंबई  -  

  अंधेरी - 'श्री स्वामी वक्रतुंड फिल्मस्’ आणि राजेंद्र आटोळे निर्मित गर्भ या आगामी मराठी चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा अंधेरीतील द व्यू या हॉटेलमध्ये झाला. या कार्यक्रमात चित्रपटाच्या ट्रेलरची आणि गाण्यांची झलक दाखवण्यात आली. सुभाष घोरपडे दिग्दर्शित गर्भ चित्रपट येत्या 17 मार्चला प्रदर्शित होणार आहे.

  समाजातील अनेक गोष्टींचं प्रतिबिंब आपल्याला सध्याच्या मराठी चित्रपटात पहायला मिळतं. प्रेक्षकांच्या याच पसंतीचा विचार करत मनोरंजनासोबत सामजिक संदेश देण्याच्या उद्देशाने गर्भ या कौटुंबिक चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमाची कथा एका कुटुंबाभोवती फिरते. आई आणि मुलाचे नाते अधोरेखित करताना नात्यांचे वेगवेगळे कंगोरे मांडण्याचा प्रयत्न गर्भ सिनेमातून करण्यात आला आहे. कविता (सिया पाटील) आणि राहुल (सुशांत शेलार) या दाम्पत्याच्या सुखी सहजीवनामध्ये अचानक एक वादळ निर्माण होतं. या वादळाला हे दाम्पत्य कसं सामोरं जातं? सुख-दु:खात एकमेकांना पूर्णपणे साथ देणारं हे दाम्पत्य त्यातून बाहेर पडणार का? याची कहाणी म्हणजे गर्भ सिनेमा.

  स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, वैशाली माडे, नेहा राजपाल, रोहित शास्त्री, दिशा तूर यांनी चित्रपटाची गाणी गायली आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.