Advertisement

‘ख्वाडा’, ‘बबन’नंतर भाऊराव कऱ्हाडेंचा ‘हैद्राबाद कस्टडी’

भाऊराव कऱ्हाडे यांचं दिग्दर्शन, द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेनमेंटची प्रस्तुती आणि चित्राक्ष फिल्म्सची निर्मिती असलेल्या ‘हैद्राबाद कस्टडी’ या सिनेमाचा पहिला टीझर नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘ख्वाडा’, ‘बबन’नंतर भाऊराव कऱ्हाडेंचा ‘हैद्राबाद कस्टडी’
SHARES

‘ख्वाडा’ या सिनेमासाठी राष्ट्रीय पारितोषिक पटकावणारे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे ‘बबन’ या रोमँटिक सिनेमानंतर आपल्या आगामी सिनेमाकडे वळले आहेत. त्यांच्या आगामी मराठी सिनेमाचं शीर्षक ‘हैद्राबाद कस्टडी’ असं आहे.


टीझर प्रदर्शित 

भाऊराव यांचं दिग्दर्शन, द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेनमेंटची प्रस्तुती आणि चित्राक्ष फिल्म्सची निर्मिती असलेल्या ‘हैद्राबाद कस्टडी’ या सिनेमाचा पहिला टीझर नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आला आहे. शीर्षक आणि टीझरवरून हा सिनेमा पोलीस कोठडी आणि कैद्यांवर आधारित असल्याचा अंदाज येतो.


सिनेमाबद्दल कुतूहल

या सिनेमाच्या टीझर पोस्टरवर, थर्ड डिग्रीसाठी वापरण्यात येणारा पट्टादेखील लक्ष वेधून घेत आहे. ‘हैद्राबाद कस्टडी’ असं शीर्षक असल्यानं हा चित्रपट नेमका कशावर आधारित आहे? असा प्रश्न पडणं साहाजिक आहे. ग्रामीण बाजातील सिनेमांसाठी भाऊराव यांना ओळखलं जातं. ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ हे दोन्ही सिनेमे याच धाटणीचे असल्यामुळे त्यांचा आगामी ‘हैद्राबाद कस्टडी’ हा सिनेमा कशाप्रकारचा असेल याबाबत कुतूहल वाढत आहे.


लवकरच चित्रीकरणाला सुरुवात

विठ्ठलराव नानासाहेब कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, मोनाली संदीप फंड, भाऊसाहेब शिंदे, रजनीकांत सदाशिव निमसे आणि सुशीला कानडे यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तूर्तास, या सिनेमाविषयी जास्त माहिती देण्यात आली नसली तरी, लवकरच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचं सांगितलं जात आहे.



हेही वाचा - 

आता 'अशी' दिसते सोनाली बेंद्रे !

अभिनयासाठी ताजमधील नोकरीला ‘तिने’ ठोकला रामराम




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा