Advertisement

‘लेथ जोशी’ तैवान आणि रशिया महोत्सवात

लेथ जोशी या चित्रपटाची तैवानमधील ५८ व्या आशिया पॅसिफिक चित्रपट महोत्सवासाठी आणि रशियातील साखलीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे.

‘लेथ जोशी’ तैवान आणि रशिया महोत्सवात
SHARES

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर २० पेक्षा अधिक पुरस्कार पटकावलेल्या ‘लेथ जोशी’ या चित्रपटानं आता रशिया आणि तैवानमध्ये धडक मारली आहे. तैवानमधील ५८ व्या आशिया पॅसिफिक चित्रपट महोत्सवासाठी आणि रशियातील साखलीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या चित्रपटाची निवड झाली आहे.


वास्तववादी कथा

लेथ यंत्राशी भावनात्मकरित्या जोडलेल्या एका कामगाराची भावस्पर्शी कथा ‘लेथ जोशी’ या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. काळाच्या ओघात कौशल्याची साधनं आणि त्याच्याशी जोडलेल्या भावनाही लोप पावतात. ही निरंतन प्रक्रिया आहे. ‘लेथ जोशी’ या चित्रपटात लेथ या यंत्राशी जोडलेली कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.


प्रेक्षक, समिक्षकांची दाद

अमोल कागणे स्टुडिओजच्या अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांची प्रस्तुत, प्रवाह निर्मिती आणि डॉन स्टुडिओज निर्मित हा चित्रपट मंगेश जोशी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात चित्तरंजन गिरी, अश्विनी गिरी, ओम भूतकर, सेवा चौहान, अजित अभ्यंकर आदींच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं समीक्षक आणि प्रेक्षकांची दाद मिळवली होती.


आनंदाची बाब

जगभरातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या काही चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या या महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवातील निवडीबाबत आनंद व्यक्त करत चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते अमोल कागणे म्हणाले की, ‘हलाल’ या चित्रपटानंतर ‘लेथ जोशी’ हा आशयसंपन्न चित्रपट आम्ही बनवला. सामाजिकदृष्ट्या हा चित्रपट महत्त्वपूर्ण भाष्य करतो. आतापर्यंत २० पेक्षा अधिक महोत्सवांमध्ये दाखवल्या गेलेल्या या चित्रपटाची रशिया आणि तैवानमधील प्रतिष्ठेच्या महोत्सवांसाठी निवड होणं नक्कीच आनंदाची गोष्ट असल्याचं कागणे म्हणाले.



हेही वाचा-

जो थांबला, तो संपला!

कॉम्रेड अजित अभ्यंकर रुपेरी पडद्यावर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा