Advertisement

‘पुष्पक विमान’ ची संगीतमय सफर सुरू


‘पुष्पक विमान’ ची संगीतमय सफर सुरू
SHARES

अभिनय आणि दिग्दर्शनासोबतच अभिनेता सुबोध भावे लेखन आणि सिनेनिर्मितीकडेही वळला आहे. सुबोधची पहिली निर्मिती असलेल्या ‘पुष्पक विमान’ या सिनेमाची संगीतमय सफर सुरू झाली आहे.

झी स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या सुबोध भावे लिखित आणि वैभव चिंचाळकर दिग्दर्शित 'पुष्पक विमान' या सिनेमाचा संगीत प्रकाशन सोहळा महागुरू सचिन पिळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत संपन्न झाला. या सोहळ्याला झी स्टुडिओजचे शारिक पटेल, मंगेश कुलकर्णी तसंच सिनेमातील कलावंत-तंत्रज्ञ उपस्थित होते. या सिनेमातील गीतांना नरेंद्र भिडे यांनी संगीत दिलं आहे.


आजोबा - नातवाची गोष्ट 

आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त. नंतर लाख आले तरी पहिल्या दोस्ताची सर नाही आणि नातू आजोबाचा शेवटचा दोस्त. तो असल्यावर दुसऱ्या दोस्तांची गरजच नाही. अशाच आजोबा आणि नातवाची म्हणजेच तात्या आणि विलासची गोष्ट ३ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘पुष्पक विमान’ या सिनेमात पाहायला मिळणार आहे.


चित्रपटात सहा गाणी

समीर सामंत आणि चेतन सैंदाणे यांनी शब्दबद्ध केलेली एकूण सहा गाणी या चित्रपटात आहेत. ही गाणी नरेंद्र भिडे आणि संतोष मुळेकर यांनी संगीतबद्ध केली असून, शौनक अभिषेकी, आनंद भाटे, जयतीर्थ मेवुंडी, विनय मांडके आणि नकाश अझीझ या आघाडीच्या गायकांनी गायली आहेत. या चित्रपटात मोहन जोशी, सुबोध भावे, गौरी किरण आणि सुयश झुंझूरके हे कलाकार आहेत. याशिवाय गायक राहुल देशपांडे एका खास भूमिकेत दिसणार आहे. मंजिरी सुबोध भावे, अरुण जोशी, मीनल श्रीपत इंदुलकर, सुनिल फडतरे आणि वर्षा पाटील यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.



हेही वाचा -

...आणि रोहित शेट्टीने महावीरला दिली शाबासकी

बोनी-अनिलच्या उपस्थितीत ‘धडक’चा ट्रेलर लाँच




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा