सगळेच देतात 'शिव्या'!

 Mumbai
सगळेच देतात 'शिव्या'!

मुंबई - कधी आनंदाने, कधी रागावून प्रत्येक जण शिव्या देतोच. आपल्या रोजच्या बोलण्यातही शिव्या असतात. शिव्या हा आपल्या भाषेचाच एक भाग आहे. शिव्या हीच संकल्पना घेऊन तयार केलेला 'ती देते, तो देतो, ते देतात, सगळेच देतात शिव्या' हा चित्रपट 21 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सतत शिव्या देणाऱ्या एका माणसाच्या आयुष्यात असा एक प्रसंग येतो, की दुसऱ्या दिवसापासून त्याला शिव्याच देता येत नाहीत. मग त्या माणसाचं काय होतं अशा धमाल संकल्पनेवर हा चित्रपट आधारित आहे. 

साकार राऊत आणि नीलेश झोपे यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. तर साकार राऊत यांनीच चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. सारा मोशन पिक्चर्स, गोल्डन पेटल्स फिल्म्स, कर्मा फिल्म्स आणि रंगमंच एंटरटेन्मेंट यांच्या वतीने साकार राऊत, नीलेश झोपे, मिहीर करकरे आणि आशय पालेकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, विद्याधर जोशी, उदय सबनीस, पियुष रानडे, शुभांगी लाटकर अशी स्टारकास्ट आहे.

Loading Comments