Advertisement

निखिल रानडेचा 'स्कॉटलंड'मध्ये म्युझिक सिंगल!

इंग्रजी आणि हिंदी म्युझिक अल्बमपाठोपाठ मराठी गाणीही आता ग्लॅमरस होतायत. यातच आता 'बेफिकर'ची भर पडणार आहे. मूळ पेशानं छायाचित्रकार असलेल्या निखिलनं आपला पार्श्वगायनाचा छंद कायम ठेवलाय. आणि यातूनच आता 'बेफिकर'ची निर्मिती होत आहे.

निखिल रानडेचा 'स्कॉटलंड'मध्ये म्युझिक सिंगल!
SHARES

म्युझिक सिंगलची नवी क्रेझ सध्या मराठी गायक-निर्मात्यांमध्ये सुरु आहे. यामध्ये टिपिकल स्टु़डिओ शूटला फाटा देत नवनवीन लोकेशन्सवर शुटिंग करण्यावर निर्मात्यांचा भर असतो. निखिल रानडेने मात्र वेगळी वाट निवडली आहे. त्याने थेट स्कॉटलंडमध्ये जाऊन त्याच्या आगामी 'बेफिकर' या म्युझिक सिंगलचं शूट केलं आहे.



छायाचित्रकार ते गायक!

इंग्रजी आणि हिंदी म्युझिक अल्बमपाठोपाठ मराठी गाणीही आता ग्लॅमरस होतायत. यातच आता 'बेफिकर'ची भर पडणार आहे. मूळ पेशानं छायाचित्रकार असलेल्या निखिलनं आपला पार्श्वगायनाचा छंद कायम ठेवलाय. आणि यातूनच आता 'बेफिकर'ची निर्मिती होत आहे.

यापूर्वी निखिलने 'इशारा तुझा' म्युझिक सिंगलची निर्मिती केली होती. या म्युझिक सिंगलला तरुणांनी चांगलीच पसंती दर्शवली होती. परदेशात पहिल्यांदाच चित्रीत करण्यात आलेल्या मराठी 'इशारा तुझा' या म्युझिक सिंगलमध्ये निखिलने स्वतः अभिनेत्याची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे निखिलची निर्माता, दिग्दर्शक तसेच गायक म्हणून सर्वांना परिचित झाला.



आगामी वर्षात तीन म्युझिक सिंगल!

निखिल रानडेने आपल्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत 'झोका तुझा', 'इशारा तुझा' या मराठी गाण्यांचं तर 'जोगी' या हिंदी गाण्याचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली. निखिलचे येत्या वर्षी ३ विविध पठडीचे म्युझिक सिंगल आपल्या भेटीला येणार आहेत. निखिलने स्वरबद्ध केलेला 'बेफिकर' हा म्युझिक सिंगल लवकरच प्रदर्शित होणार असून पेपी ट्रॅक असलेलं हे गाणं तरुणाईला आपल्या तालावर ठेका धरायला भाग पाडणार आहे.



हेही वाचा

अभिनयपाठोपाठ लाडक्या 'लक्ष्या'ची धाकटी मुलगीही पदार्पणासाठी सज्ज!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा