Advertisement

अभिनयपाठोपाठ लाडक्या 'लक्ष्या'ची धाकटी मुलगीही पदार्पणासाठी सज्ज!


अभिनयपाठोपाठ लाडक्या 'लक्ष्या'ची धाकटी मुलगीही पदार्पणासाठी सज्ज!
SHARES

मराठी सिनेरसिकांना खळखळवून हसवणारा लक्ष्मीकांत बेर्डे अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. पण प्रेक्षकांना चटका लावणारी त्यांची अनपेक्षित एक्झिट कुणीही विसरू शकणार नाही. मागच्या वर्षी 'ती सध्या काय करते?' या सिनेमातून लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. आणि मराठी प्रेक्षकांना 'लक्ष्या'ची आठवण करून दिली. आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत त्याची बहीण चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.


स्वानंदीचा 'रिस्पेक्ट'!

स्वानंदी बेर्डे ही अभिनयची धाकटी बहीण. स्वानंदी आत्तापर्यंत फारशी चर्चेत नव्हती. त्यामुळे मराठी प्रेक्षकांसाठी हे तिचं सरप्राईज असणार आहे. 'रिस्पेक्ट' नावाच्या मराठी सिनेमातून स्वानंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. किशोर बेळेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.


रिस्पेक्टमध्ये ७ महिलांची कथा

रिस्पेक्ट हा महिलांच्या प्रश्नांभोवती फिरणारा चित्रपट आहे. यामध्ये सात महिलांची कथा दाखवण्यात आली आहे. यातलीच एक भूमिका स्वानंदी साकारणार आहे. स्वानंदीची भूमिका कशी असेल? तिचं नाव काय असेल? तिची कथा काय असेल? हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? याविषयी अद्याप कोणतीही माहिती निर्मात्यांकडून जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्वानंदीच्या पदार्पणाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा