Advertisement

'अभिनय' बेर्डेला हवंय म्हाडाचं घर

मुंबईसारख्या महागड्या शहरात आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून अभिनय बेर्डेने कलाकारांच्या कोट्यातून म्हाडाच्या घरासाठी अर्ज भरला आहे.

'अभिनय' बेर्डेला हवंय म्हाडाचं घर
SHARES

लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच आपला लाडका लक्ष्याचा मुलगा अभिनय बेर्डे वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत मराठी चित्रपटसृष्टीत स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळेस दुसरीकडे अभिनय मुंबईसारख्या महागड्या शहरात आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणूनही धडपडत आहे. होय हे खरं आहे. म्हणूनच अभिनयने कलाकारांच्या कोट्यातून म्हाडाच्या घरासाठी अर्ज भरला आहे.


कलाकारांची धडपड

मुंबईसारख्या महागड्या शहरात हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करणं भल्याभल्यांना जमत नाही. अशावेळी अनेकजण खासगी बिल्डरच्या तुलनेत स्वस्त घरांचा पर्याय म्हणून म्हाडाकडे आधार म्हणून पाहतात. तशीच धडपड मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारही करतात. अभिनय हे त्याचं ताजं उदाहरण


'याचं' स्वप्न साकार

अभिनेता जितेंद्र जोशी, प्रथमेश परब, विशाखा सुभेदार यांच्यासह अनेकांच्या हक्काच्या घराचं स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण झालं आहे. त्यामुळे दरवर्षी म्हाडाच्या लाॅटरीसाठी सेलिब्रिटींकडून अर्ज सादर होतात.


कुठल्या घरासाठी अर्ज?

त्यानुसार यंदा म्हाडाच्या घरासाठी अभिनयने अर्ज केला आहे. शिंपोलीतील उच्च उत्पन्न गटाताली संकेत क्रमांक २६७-सी साठी त्याने अर्ज केला असून आता १० नोव्हेंबरला नेमकं काय होतं, याकडे अभिनयचं लक्ष असणार आहे.


आम्ही सध्या मीरारोडला राहतो. आमचं स्वत:चं हक्काचं घर नाही. त्यातच शुटींगला सोईस्कर म्हणून गोरेगाव वा कांदिवलीत घर असायला हवं असं वाटतं. त्यामुळे मी म्हाडाच्या शिंपोलीतील घरासाठी अर्ज केला आहे. अर्ज केल्यानंतर शिंपोलीतील घर मला छोटं वाटतंय. पण बघूया पुढे काय होतं ते.

- अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे, अभिनेता



हेही वाचा-

म्हाडाची लाॅटरी पाहा 'फेसबुकवर लाइव्ह'वर

म्हाडा लॉटरी - महागडी घरे, नको रे बाबा!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा