Advertisement

म्हाडाची लाॅटरी पाहा 'फेसबुकवर लाइव्ह'वर


म्हाडाची लाॅटरी पाहा 'फेसबुकवर लाइव्ह'वर
SHARES

म्हाडाच्या मुंबईतील ८१२ घरांसाठी शुक्रवारी १० नोव्हेंबरला वांद्र्याच्या रंगशारदामध्ये लाॅटरी फुटणार आहे. अनेक अर्जदारांना नोकरीधंद्यामुळे वा इतर कामामुळे लाॅटरीच्या सोडतीला प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य होत नाही. अशा अर्जदारांच्या सोईसाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने यंदा फेसबुक लाइव्हवर 'लाॅटरी लाइव्ह' दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अर्जदारांना घरबसल्या 'लाॅटरी लाइव्ह' पाहता येणार आहे. 


रंगशारदाबाहेरही अर्जदारांसाठी सुविधा 

गेल्या काही वर्षांत म्हाडाच्या घरासाठी हजारो-लाखोंनी अर्ज येत असून लाॅटरीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याकडेही अर्जदारांचा कल वाढत चालला आहे. रंगशारदामध्ये ६०० ते ७०० अर्जदारांची बसण्याची व्यवस्था असते. अर्जदारांच्या संख्येच्या तुलनेत ही व्यवस्था अपुरी ठरते. त्यामुळे म्हाडाला सभागृहाबाहेर मंडप टाकत, एलईडी लावत अर्जदारांना लाँटरी लाइव्ह पाहण्याची व्यवस्था करावी लागते. 


वेबसाईटवरील लाॅटरी लाइव्हलाही चांगला प्रतिसाद

सध्या डिजिटलचं युग असल्याने म्हाडाचा कलही डिजिटल होण्याकडे वाढत चालला आहे. त्यातूनच गेल्या काही वर्षांपासून म्हाडाच्या वेबसाईटवर लाॅटरी लाइव्ह दाखवली जात असून त्याला प्रतिसादही चांगला मिळतो आहे. त्यापुढे जात म्हाडाने 'फेसबुक लाइव्ह'च्या माध्यमातून लाॅटरी घरबसल्या पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अर्जदारांनो, १० नोव्हेंबरला 'फेसबुक लाइव्ह'वर म्हाडा लाॅटरी लाइव्ह पाहाच.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा