रसिकांसाठी मराठीभाव संगीत

 Dadar
रसिकांसाठी मराठीभाव संगीत
Dadar , Mumbai  -  

दादर - सध्या तरुणाईला नवनवीन इंग्रजी, हिंदी गाण्यांची भुरळ पडली आहे. सोशल नेटवर्कींगवर वाढता इंटरनेटचा वापर यामुळे कुठेतरी मराठीभाव संगीत मागे पडत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मराठीभाव संगीत रसिकांच्या मनात जोपासले जावे यासाठी रिदम आणि रागा या संस्थेने मराठीभाव संगीताच्या मैफिलीचे आयोजन केले आहे.

रविवारी 26 मार्चला रात्री 8 वाजता दादरच्या शिवाजी मंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे. मराठी भाव संगीत आणि चित्रपटांमध्ये सुधीर फडके आणि ह्रदयनाथ मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. या मैफिलीत 11 गायक गाणार असून 10 वादक संगीत साथ देणार आहेत.

Loading Comments