Advertisement

नाट्यरसिकांसाठी दीर्घांकांची पर्वणी


नाट्यरसिकांसाठी दीर्घांकांची पर्वणी
SHARES

नवोदित कलाकारांना उत्तम संधी, योग्य व्यासपीठ आणि व्यावसायिक यश मिळावं या हेतूने 'व्हाईट लाईज प्रोडक्शन्स' या संस्थेच्या संस्थापिका अॅडव्होकेट ज्योती मुळे यांनी नाटकप्रेमींसाठी १६ आणि १७ जानेवारीला दीर्घांक महोत्सव आयोजित केला आहे. या दीर्घांक महोत्सवात एकूण ४ दीर्घांक रसिक प्रेक्षकांना बघता येतील. या चारही दीर्घांकांचं लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद थोरवे यांनी केलं आहे. याआधी प्रसाद थोरवे यांनी अनेक बालनाट्य आणि महाविद्यालयीन एकांकिकांचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.


महोत्सावात या दीर्घांकांची पर्वणी

  • ग्रीड अँड फिअर - या दीर्घांकामध्ये विविध राजकीय विचारांवर भाष्य केलेले आहे
  • द सेकंड सेक्स - हा दिर्घांक बदलत्या स्त्री-पुरूष संबंधांवर आणि त्याच्या परिणामांवर भाष्य करतो
  • निशान-ए-पाकिस्तान - यात गुप्तचर संघटना आणि राजकारणावर आधारीत कथा असणार आहे
  • अनोळखी - या दिर्घांकामध्ये कवितेवरील नाट्याचा सुंदर प्रयोग करण्यात आला आहे


महोत्सव कुठे?

१६ आणि १७ जानेवारीला संध्याकाळी ६ ते रात्री ८.३० या वेळेत साठ्ये महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम येथे हा महोत्सव रंगणार आहे. यामध्ये ४ दिर्घांकाचं सादरीकरण केलं जाणार आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा