Advertisement

'गाव गाता गजाली' घेणार प्रेक्षकांचा निरोप

मालवणी भाषा, गावात घडणाऱ्या गंमती जमती, कोणत्याही परिस्थितीत गावातील लोकांचा एकोपा प्रेक्षकांना खूप भावला. मात्र, प्रेक्षकांची ही लाडकी मालिका लवकरच निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी कोणतीही नवी मालिका येणार नसल्याचं चॅनेलकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

'गाव गाता गजाली' घेणार प्रेक्षकांचा निरोप
SHARES

'झी मराठी'वरील 'गाव गाता गजाली' या मालिकेला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. मालवणी भाषा, गावात घडणाऱ्या गंमती जमती, कोणत्याही परिस्थितीत गावातील लोकांचा एकोपा प्रेक्षकांना खूप भावला. मात्र, प्रेक्षकांची ही लाडकी मालिका लवकरच निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी कोणतीही नवी मालिका येणार नसल्याचं चॅनेलकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर यावेळात 'जागो मोहन प्यारे' या मालिकेला स्लॉट देण्यात आला आहे.



कोकणी संस्कृतीची लोकप्रियता

'चूकभूल द्यावी घ्यावी' या मालिकेच्या जागी 'गाव गाता गजाली' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या आधी मालवणी भाषेचा गोडवा असलेली 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या मालिकेमुळे कोकण, कोकणातील संस्कृती, कोकणी भाषेची ओळख सगळ्यांना झाली. या मालिकेनंतर  'गाव गाता गजाली'मधून प्रेक्षकांनी पुन्हा कोकण अनुभवलं. 

'गाव गाता गजाली' मधील संवाद प्रेक्षकांना जास्त आपलेसे वाटले. 'मॅड झालास काय', 'व्हतल व्हतल सगळा व्हतल', 'मी कधी कुणाक काय सांगतंय काय'? हे संवाद अल्पावधीतच लोकांच्या तोंडी घोळू लागले. मालवणी भाषेत गप्पांना 'गजाली' असं म्हटलं जातं. गावात पारावर गावच्या भानगडीपासून ते थेट परदेशातील घडामोडींपर्यंत गप्पा रंगतात. त्यामुळे ही मालिका निरोप घेते म्हटल्यावर प्रेक्षकांचा हिरमोड होणार हे नक्की.



लवकरच 'ग्रहण' लागणार!

पण लवकरच 'ग्रहण' ही नवी मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे प्रोमो तुम्ही पाहिले असतील. प्रोमोवरून ही मालिका रहस्यमय किंवा हॉरर असल्याचं वाटतंय. या मालिकेतून पल्लवी जोशी पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे.


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा