Advertisement

सैराटच्या नावानं चांगभलं


सैराटच्या नावानं चांगभलं
SHARES

ज्या मराठी चित्रपटाने बॉक्स अॉफिसवरची गणित बदलली, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरश: वेड लावलं असा सैराट या चित्रपटाला येत्या २९ एप्रिलला २ वर्ष पूर्ण होतं आहेत. २ वर्ष झाली तरी या चित्रपटाची जादू तसूभरही कमी झाली नाही. सैराटच्या पहिल्या दिवसांपासून आजपर्यंत प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं. मात्र या सगळ्यामागे सैराटच्या टीमचं तेवढंच कष्ट होतं. हीच सैराटच्या पडद्यामागची गोष्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
'सैराटच्या नावानं चांगभल'

एक यशस्वी चित्रपट बनण्यामागे अनेकांचे कष्ट असतात. त्या चित्रपटाची कथा नरेट करण्यापासून तो प्रद्रशित होण्यापर्यंतच्या प्रवासात दिग्दर्शकाची, पडद्यामागच्या कलाकारांची किती मेहनत असते. ते आता 'सैराटच्या नावानं चांगभल' या कार्यक्रमाद्वाके बघायला मिळणार आहे. येत्या २९ एप्रिलपासून दर रविवारी दुपारी १२ वाजता प्रेक्षकांच्या समोर पडद्यामागचा सैराट येणार आहे.

झी टॉकीज नेहमीच महाराष्ट्रातील प्रेक्षकांचं मनोरंजन करत आली आहे, सैराटच्या यशाचं आपण सर्वच साक्षीदार आहोत. हा चित्रपट बनवण्यामागे संपूर्ण टीमने किती मेहनत घेतली आहे. हे मेहनत प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी सैराटच्या नावाने चांगभलं हा कार्यक्रम प्रेक्षकांसमोर आणला आहे.
- बवेश जानवलेकर, बिझनेस हेड (झी टॉकीज)

संबंधित विषय
Advertisement