Advertisement

मिर्झापूरमधल्या 'या' अभिनेत्याचा मृतदेह बाथरुममध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला

दिव्येंदु शर्मा यांनी इंस्टाग्रामवर ललितचा फोटो शेअर करून ही दुःखद बातमी शेअर केली आहे.

मिर्झापूरमधल्या 'या' अभिनेत्याचा मृतदेह बाथरुममध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला
SHARES

मिर्झापूर-२ (Mirzapur) सारख्या वेबसीरीजमध्ये ललितचे लोकप्रिय पात्र साकरणाऱ्या ब्रह्मा मिश्राचं (Bramha Mishra) निधन झालं आहे. ब्रह्मा याला २९ नोव्हेंबर रोजी छातीत दुखत असल्यानं डॉक्टरांनी प्राथमिक औषधोपचार सुरू केले होते. मात्र घरीच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचं निधन झालं.

दिव्येंदु शर्मा यांनी इंस्टाग्रामवर ललितचा फोटो शेअर करून ही दुःखद बातमी शेअर केली आहे.

ब्रह्मा याला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा तो बाथरूममध्ये होता. त्याचा मृतदेह सलग तीन दिवस मुंबईतील वर्सोवा इथल्या घरात बाथरूममध्येच राहिला. सध्या मुंबई पोलीस त्याच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम करत आहे. जेणेकरून त्याच्या मृत्यूचे योग्य कारण कळू शकेल.

वर्सोव्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिराज इनामदार म्हणाले की, आज दुपारी १२.३० वाजता पोलीस नियंत्रणाला एक फोन आला.

त्यांनी सांगितलं की, यारी रोडवर असलेल्या इनलक्स नगर सोसायटीच्या डी विंग १३ क्रमांकाच्या खोलीत दुर्गंधी येत आहे, पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी डुप्लिकेट चावीने घर दरवाजा उघडला. पाहिले शौचालयाचा वास येत होता आणि शौचालयाचा दरवाजा उघडा होता, अभिनेत्याचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत शौचालयात होता, जो पूर्णपणे कुजलेला होता.

ललितच्या पात्रामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला ब्रह्मा मिश्रा हा फक्त ३२ वर्षांचा होता. भोपाळमधील रायसेन इथल्या रहिवासी असलेला ब्रह्मा केवळ दहावीपर्यंत शिकलेला होता. त्याचे वडील भूविकास बँकेत कार्यरत होते. ब्रह्मानं मिर्झापूरसह केसरी, हसीन दिलरुबा, मांझी, बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा