मनसेचा पुन्हा राडा

    मुंबई  -  

    अंधेरी - याकुब मेमनच्या आयुष्यावर आधारीत 'हँग टिल्ल डेथ' या चित्रपटावरून नवा वाद समोर आलाय. अंधेरीतल्या फन थिएटरमध्ये आयोजित चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत मनसे चित्रपट सेनेनं गोंधळ घातला. चित्रपटामध्ये जर याकुब मेमनला हिरो बनवण्यात आलं तर कुठल्याच थिएटरमध्ये चित्रपट चालू देणार नाही, अशी धमकीच मनसेने चित्रपटाचे निर्माते आसिफ काजी यांना दिलीय. त्यामुळे 23 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.