Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
60,07,431
Recovered:
57,62,661
Deaths:
1,19,859
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,810
789
Maharashtra
1,21,767
9,371

'तारक मेहता की 'मराठी'चे मारक मेहता?', मनसे आक्रमक

नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे. त्यावरून मनसे आक्रमक झाली आहे. काय बोलले अमेय खोपकर वाचा...

'तारक मेहता की 'मराठी'चे मारक मेहता?', मनसे आक्रमक
SHARES

सब टिव्हीवरील तारक मेहता का उलटा चष्मा ही लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा वादात सापडली आहे. या मालिकेतील जेठालालचे वडील बापुजी यांच्या तोंडी, नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे. यावर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्षेप घेतला असून याबद्दल सब टिव्ही तसंच मालिकेच्या निर्मात्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.


काय म्हणाले अमेय खोपकर?

आपल्या ट्विटर अकाऊंटवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी मनसेची भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता. मुंबईची भाषा मराठी आहे हे माहिती असतानाही मालिकांमधून पद्धतीशीर अपप्रचार सुरू असतो. या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही याची शरम वाटत नाही, याचीच शरम वाटत असल्याचे खोपकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.


नेमका काय आहे डायलॉग?

या मालिकेच्या नुकत्याच प्रसारित करण्यात आलेल्या एका भागात प्रत्येक समुदायातील व्यक्ती हा आपल्या मातृभाषेमधूनच संवाद साधणार असा निश्चय करतो. बापुजी हे पात्र यातून तयार झालेल्या विसंवादामध्ये मध्यस्थी करत आणि सर्वांचे मनोमिलन घडवून आणतात. यादरम्यान मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद बापुजींच्या तोंडी दाखवण्यात आल्यामुळे याप्रकरणी आता सब टिव्ही आणि मालिकेचे निर्माते काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.हेही वाचा

'नटसम्राट डॉ. श्रीराम लागू’ नावानं दिला जाणार पुरस्कार

'एबी आणि सीडी' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित, अमिताभ यांचा पहिला मराठी चित्रपट

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा