Advertisement

'नटसम्राट डॉ. श्रीराम लागू’ नावानं दिला जाणार पुरस्कार

राज्य सरकार तर्फे डॉ. श्रीराम लागू यांच्या नावानं पुरस्कार दिला जाणार आहे.

'नटसम्राट डॉ. श्रीराम लागू’ नावानं दिला जाणार पुरस्कार
SHARES

यंदाच्या वर्षापासून राज्य सरकाच्या वतीनं ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या नावानं पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 'नटसम्राट डॉश्रीराम लागू’ (NatSamrat Shreeram Lagoo) असं या पुरस्काराचं नाव आहे.

सांस्कृतिक क्षेत्रात विशेष लक्षणीय कार्य करणाऱ्या १२ दिग्गजांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार देत सन्मानित करण्यात येतं. या पुरस्कारांमध्ये मराठी नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराचा समावेश असतो. यंदा नाट्य क्षेत्रातील दिग्गजांना देण्यात येणारा पुरस्कार या वर्षापासून 'नटसम्राट डॉ. श्रीराम लागू’ यांच्या नावानं देण्यात येणार असल्याचं परिपत्रक राज्य सरकारनं जारी केलं आहे.

कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या 'नटसम्राट’ या नाटकात त्यांनी 'अप्पासाहेब बेलवलकर’ ही प्रमुख भूमिका साकारली आणि ती अजरामर केली. त्यातील संवाद ही रसिकांच्या विशेष लक्षात राहिली आहेत. ज्येष्ठ अभिनेते, विचारवंत अशी ख्याती असणाऱ्या डॉ. लागूंनी अनेक मराठी, हिंदीसह विविध भाषांतील चित्रपटांमध्ये काम केले

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारतीय चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी मध्ये त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या निधनानंतर  दिलगिरी व्यक्त केली. पंतप्रधानांनी लिहिलं होतं की, डॉ. श्रीराम लागू यांच्या व्यक्तिमत्वात वैविध्य आणि गुणवत्ता होती. त्यांच्या कामगिरीनं मी प्रभावीत झालो. त्यांचे कार्य अजरामर राहिल.

डॉ. श्रीराम लागू एक उत्कृष्ट अभिनेता होते आणि ते एक ईएनटी सर्जन देखील होते. आपल्या कारकीर्दीत चित्रपटां व्यतिरिक्त २० मराठी नाटकांचे दिग्दर्शनही केलं आहे. ८० आणि ९० च्या दशकात, त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटात जवळपास साठ चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. १९९० सालानंतर ते चित्रपटात फार झळकले नाहीत. पण थिएटरमध्ये ते सक्रिय राहिले.



हेही वाचा

मुंबईत भरलाय आशियाई चित्रपट महोत्सव

रणदीप हुडाची हॉलिवूडमध्ये एन्ट्री, अॅव्हेंजरमधल्या स्टारसोबत झळकणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा