राज ठाकरेंनी घेतली लतादीदींची भेट, केली तब्येतीची विचारपूस

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन 'गानसम्राज्ञी' लता मंगेशकर यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

SHARE

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन 'गानसम्राज्ञी' लता मंगेशकर यांच्या तब्येतीची विचारपूस केली. 'लतादीदींची तब्येत उत्तम असून दोन-चार दिवसांत त्यांना जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात येईल,' असं राज ठाकरे यांनी या भेटीनंतर सांगितलं.

श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्याने लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना न्युमोनिया आणि छातीत संसर्ग झाला होता. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून त्यांच्या तब्येतीबाबत अफवा पसरत असल्याने, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका हे सांगणारं पत्रक मंगेशकर कुटुंबाकडून जारी करण्यात आलं आहे.

डॉक्टरांशी माझं बोलणं झालंय. दीदींची प्रकृती उत्तम आहे. वयोमानामुळं थोडी अधिक काळजी घेतली जात आहे. पण दोन-चार दिवसांत त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं जाईल,' असं राज यांनी सांगितलं.हेही वाचा-

आधी राज ठाकरेंना भेटायलाही मातोश्रीवरुन कुणी जायचं नाही, पण आता...

लतादीदींची प्रकृती स्थिर, अफवा पसरवू नका…संबंधित विषय
ताज्या बातम्या