Advertisement

मिसेस फडणवीस यांनी गायले पवित्र गुरुबाणीचे 'शबद'


SHARES

सांताक्रूझ - मिसेस फडणवीस म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी एवढीच आपली ओळख नसल्याचं अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. पवित्र गुरुबाणीचे 'शबद' गात अमृता फडणवीस यांनी सांताक्रूझमधल्या प्रार्थनास्थळातलं वातावरण आणखी मंगल, भक्तीमय केलं.

व्यवसायानं बँकर असलेल्या अमृता फडणवीस यांनी मॉडेलिंग आणि पार्श्वगायनाच्या प्रांतात या आधीही अस्तित्व ठसवून दिलं आहे. मात्र, हा अनुभव आपल्यातली आध्यात्मिक क्षमता वाढवणारा असल्याचं त्यांनी 'मुंबई लाइव्ह' ला सांगितलं.

गुरू गोविंद सिंग यांच्या 350 व्या जयंतीनिमित्त गुरुवारी सांताक्रूझ येथील पोथॉहारनगर इथल्या गुरुद्वाराच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement