भारतीच्या लग्नाला शाहरुख, सलमान वऱ्हाडी !


SHARE

कॉमेडी क्वीन भारती सिंह ही तिचा प्रियकर हर्श लिम्बोचियासोबत लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. भारती आणि हर्ष या दोघांचे 3 डिसेंबरला गोव्यात लग्न होणार आहे. पण यापूर्वी त्यांनी पाहुण्यांना निमंत्रण देण्यासाठी एक यादी तयार केली आहे. पाहुण्यांच्या या यादीत बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि दबंग सलमान खान या दोघांच्या नावांचा देखील समावेश आहे.


या कलाकारांना लग्नाचे निमंत्रण

कॉमेडी क्षेत्रात प्रसिद्धीच्या झोतावर असलेल्या भारतीचे आज टीव्हीतच नाही तर बॉलिवूड जगतातही अनेक मित्र आहेत. ज्यांना ती आपल्या लग्नात निमंत्रण देऊ इच्छिते. भारती स्वत: शाहरुख खान, सलमान खान, करण जोहर, माधुरी दीक्षित, मलाईका अरोरा यांना आपल्या लग्नाचे निमंत्रण देणार आहे. तिच्या लग्नात सिनेसृष्टीतील कलाकार गर्दी करतील असा भारतीला विश्वास आहे.

ती म्हणते मी मागील 8 वर्षांपासून कॉमेडी क्षेत्रात काम करत आहे. आता माझ्या लग्नात सर्व गोष्टींचा आनंद मला अनुभवायचा आहे. लग्नानंतर जानेवारीमध्ये मी माझ्या कामाला पुन्हा सुरुवात करणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या