Advertisement

विशाल भारद्वाज यांच्या हस्ते 'ड्राय डे' चे म्युझिक लॉन्च


विशाल भारद्वाज यांच्या हस्ते 'ड्राय डे' चे म्युझिक लॉन्च
SHARES

'ड्राय डे' या सिनेमाच्या नावामुळेच त्याची बरीच चर्चा होत होती. नुकतंच या सिनेमाचा म्युझिक लॉन्च सोहळा मुंबईत पार पडला. हिंदीचे सुप्रसिद्ध, निर्माते, दिग्दर्शक आणि संगीतकार विशाल भारद्वाज यांच्या हस्ते 'ड्राय डे' सिनेमाच्या गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले. संजय पाटील यांची निर्मिती असलेल्या या सिनेमातील जय अत्रे लिखित 'अशी कशी' आणि  'दारू डिंग डांग' ही दोन गाणी म्युझिक लॉन्च सोहळ्यात सादर करण्यात आली.


संगीतदिग्दर्शक अश्विन श्रीनिवासन यांनी संगीतबद्ध केलेल्या या दोन गाण्यांपैकी 'अशी कशी' हे प्रेमगीत असून, जोनीता गांधी आणि अॅश किंग या हिंदीच्या सुप्रसिद्ध गायकांचा आवाज त्याला लाभला आहे. आजच्या तरुण पिढीला प्रेमाच्या गुलाबी दुनियेची सफर या गाण्यातून होणार आहे, शिवाय आजच्या तळीरामांवर आधारित 'दारू डिंग डांग' हे गाणेदेखील झिंग चढवणारे ठरत आहे. 

मराठी चित्रपटसृष्टीतल्या या 'ड्राय डे' चे लेखन आणि दिग्दर्शन पांडुरंग जाधव यांनीच केले असून, नितीन दीक्षित यांनी पटकथा व संवाद लिहिले आहेत. तरुणाईवर आधारीत असलेल्या या सिनेमात ऋत्विक केंद्रे, कैलाश वाघमारे, योगेश माधव सोहनी, पार्थ घाडगे, चिन्मय कांबळी,  मोनालिसा बागल, आयली घिए, अरुण नलावडे आणि जयराम नायर हे कलाकार पहायला मिळणार आहेत.



हेही वाचा

अमृता फडणवीस बिग बींसोबत नाचतात तेव्हा..!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा