प्रेमाय नम:

 Andheri
प्रेमाय नम:
Andheri, Mumbai  -  

अंधेरी - 24 फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या 'प्रेमाय नम:' या सिनेमाचा म्यूझिक लाँच सोहळा नुकताच अंधेरीच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. अभिनेता-दिग्दर्शक श्रेयश तळपदे याच्या हस्ते सोमवारी हा म्यूझिक लाँच सोहळा पार पडला. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. यावेळी चंद्रशेखर जनावडे यांच्या लेखणीतून अवतरलेल्या 'झालो बेभान मी' या गाण्याने खरी रंगत आणली.

'व्हेलेंटाईन' डे जवळ आला की बरेच रोमँटिक सिनेमे प्रदर्शित होतात. त्यापैकी 'प्रेमाय नम:' ही प्रेमकथा घेऊन देवेंद्र चौघुले, रुपाली कृष्णाराव, सुरेखा कुडची, प्रकाश धोत्रे, भरत दैनी, गौरी मगदूम आदी कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सिनेमाचा गाभा रोमँटिक आहे. मराठी सिनेमाच्या इतिहासामध्ये पाहिल्यांदाच पाण्याखाली शूट केलेलं गाणं या चित्रपटातून बघायला मिळणार आहे.

Loading Comments