• प्रियल साठेंच्या गायनाची जादू
SHARE

माटुंगा - रविवारी दादर-माटुंगा कला केंद्राच्या वतीनं सुमती गायतोंडे चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत प्रियल साठे यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला. या वेळी प्रियल साठे यांना अभय दातार यांनी तबला तर सुप्रिया जोशी यांनी पेटीवर साथ दिली. दर महिन्याला कला केंद्रात आवर्जून उपस्थिती दर्शवणाऱ्या रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमालाही भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाच्या नियोजनानुसार रविवारी आरती टिकेकर गाणार होत्या, पण प्रकृतीच्या कारणास्तव त्या हजर राहू शकल्या नाहीत. पण प्रियल साठे यांनी रसिकांना आरती टिकेकर यांची अनुपस्थिती जाणवूच दिली नाही.

संबंधित विषय
ताज्या बातम्या