सूनबाई येती घरा, तोची दिवाळी दसरा

खरं तर ‘साधूसंत येती घरा, तोची दिवाळी दसरा’, असं आपल्याकडं बोललं जातं, पण याचं काहीसं विडंबन ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या नव्या मालिकेत पहायला मिळणार आहे.

SHARE

खरं तर ‘साधूसंत येती घरा, तोची दिवाळी दसरा’, असं आपल्याकडं बोललं जातं, पण याचं काहीसं विडंबन ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या नव्या मालिकेत पहायला मिळणार आहे.

छोट्या पडद्यावर सुरू होणाऱ्या ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मालिकेला मराठवाड्याची पार्श्वभूमी लाभली आहे. पावसाळ्यातही मेघधारांनी बरसण्यास जिथं नकार दिला त्या मराठवाड्यात घडणाऱ्या या कथानकाच्या माध्यमातून विनोदी शैलीत भाष्य करण्यात आल्याचं पहायला मिळणार आहे. यंदा पाऊस महाराष्ट्रावर पुरता बरसला असला, तरी मराठवाडा मात्र तहानलेला आहे. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच मराठवाड्यात उद्भवली आहे एक नवी समस्या. ही समस्या आहे एका आईची. लग्नाचं वय पार केलेल्या या आईच्या ४ मुलांसाठी काही केल्या मुलगी मिळत नाही.

असंच काहीसं कथानक सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या नव्या मालिकेत पहायला मिळणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर एक वेगळीच समस्या येणार आहे. आता तरी ठरलं पाहिजे, घर सुनांनी भरलं पाहिजे, एवढीच इच्छा असणाऱ्या या माउलीला मराठवाड्यातली परिस्थिती काही साथ देत नाही. एकीकडं नंदी बैलानं डोलावलेली नकारार्थी मान, तर दुसरीकडं विवाह संस्थेकडून आलेला नकार, हे सगळं पचवून या वर्षी आपल्या मुलांची लग्नं करण्याचा निश्चय तिनं केला आहे.

सामाजिक समस्या विनोदी शैलीनं मांडण्यात हातखंडा असणारे दिग्दर्शक समीर पाटील या मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत. समीर पाटील यांनी मांडलेली या आईची व्यथा पाहताना धमाल येणार यात शंका नाही. तेव्हा ‘सूनबाई येती घरा, तोची दिवाळी दसरा’, अशी अवस्था झालेल्या या आईची सासूबाई होण्याची इच्छा कधी आणि कशी पूर्ण होणार हे ७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या 'नवरी मिळे नवऱ्याला' या मालिकेत पहायला मिळेल.हेही वाचा -

‘३ इडियट्स’मधील सेंटीमीटरला मिळणार ‘शिष्यवृत्ती’

'अशी ही बनवाबनवी'ची ३१ वर्ष, आजही हे १० डायलॉग प्रेक्षकांना हसवतात
संबंधित विषय
ताज्या बातम्या