Advertisement

मालदीवला फिरायला जाणाऱ्या कलाकारांवर भडकला नवाजुद्दीन

फिरायला जाणाऱ्या सेलिब्रिटींवर नवाजुद्दीन सिद्दीकी भडकला. एका मुलाखतीत त्यानं आपली नाराजी व्यक्त केली.

मालदीवला फिरायला जाणाऱ्या कलाकारांवर भडकला नवाजुद्दीन
SHARES

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात आक्राळविक्राळ रुप धारण केलं आहे. सगळीकडे औषधं, बेड्स, ऑक्सिजनचा अभाव बघायला मिळतोय. अशा परिस्थितीत पण अनेक कलाकार मात्र परदेशी जाऊन सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. आणि त्यांच्या सुट्टीचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. अशा कलाकारांवर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने निशाणा साधला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीनला सेलिब्रिटींच्या सुट्टी आणि त्यांच्या शेअर करत असलेल्या फोटोंबद्दल विचारण्यात आलं. यावर व्यक्त होताना तो म्हणाला, 'ते काय बोलणार? अभिनयाबद्दल? या लोकांनी तर मालदीवला तमाशा बनवून ठेवलं आहे. त्यांच्या पर्यटन उद्योगाची काय व्यवस्था आहे? हे मला माहित नाही. पण माणुसकीच्या नात्यानं तरी तुमचे फोटो सोशल मीडियावर शेअर करू नका. तुमचे फोटो तुमच्याकडेच ठेवा.'

पुढे नवाजुद्दीन म्हणाला, 'इथं प्रत्येकजण मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत. जे लोक वाईट परिस्थितीचा सामना करत आहेत त्यांना असे फोटो दाखवून त्यांचे मन आणखी दुखावू नका. इथं लोकांना खायला अन्न मिळत नाहीये आणि यांना पैसे उडवायचे आहेत. आम्ही जे लोकांची करमणूक करणारे आहोत ना, आम्हाला थोडं मोठं व्हावे लागेल. आम्हाला खूप लोक फॉलो करतात. मग आम्हाला आमची जबाबदारी पार पाडायला हवी.'

अभिनेत्री श्रुती हसननं वाढत्या कोरोना संक्रमणावर चिंता व्यक्त करत अशा वेळी सुट्टीवर जाणाऱ्या सेलिब्रिटींवर नाराजी व्यक्त केली होती. श्रुती म्हणाली होती, “मला आनंद आहे की त्यांना एक चांगली सुट्टी मिळाली. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र वैयक्तिक मला या काळात मास्क न घालता पूलमध्ये मज्जा करणे योग्य वाटत नाही. प्रत्येकासाठी ही कठीण वेळ आहे आणि काहींसाठी तर खूपच खडतर. मला वाटतं तुमच्याकडे ज्या सुखसोयी आहेत त्यासाठी तुम्ही आभारी आणि कृतज्ञ असायला हवे. तुमच्याकडील सुखसोयींचा लोकांसमोर दिखावा करण्याची ही गरज नाही.'



हेही वाचा

‘गोकुळधामची दुनियादारी’ यू ट्युब चॅनेलवरही हिट!

शर्मिला टागोर, नाना पाटेकर, प्यारेलाल यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा