Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

शर्मिला टागोर, नाना पाटेकर, प्यारेलाल यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी संगीत, समाजसेवा, रंगभूमी, साहित्य, चित्रपट, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.

शर्मिला टागोर, नाना पाटेकर, प्यारेलाल यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
SHARES

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणाऱ्या मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्काराची रविवारी घोषणा करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, अभिनेते प्रेम चोपडा आणि नाना पाटेकर, ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा, मीना खाडिलकर, गायिका उषा मंगेशकर आदींना पुरस्कार जाहीर झाले आहेत. दीनानाथ यांच्या ७९ व्या स्मृतिदिनानिमित्त हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. 

मागील अनेक वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने हा मानाचा पुरस्कार दिला जातो.  प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी संगीत, समाजसेवा, रंगभूमी, साहित्य, चित्रपट, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.

सन २०२० च्या मास्टर दीनानाथ स्मृती पुरस्काराची घोषणा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली. त्यात वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. प्रतित समधानी, डॉ. अश्विनी मेहता, डॉ. राजीव शर्मा, डॉ. जनार्दन निंबाळकर आणि डॉ. निशित शहा यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ कवी-गीतकार संतोष आनंद आणि पत्रकारितेसाठी सामनाचे संपादक संजय राऊत यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

१ लाख ११ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. कोरोनामुळे सध्या कोणतेही समारंभ होत नाहीत. त्यामुळे हे पुरस्कार या विजेत्यांना नंतर देण्यात येतील, असे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितलं.हेही वाचा -

दिलासादायक! मुंबईतील 'इतके' टक्के रुग्ण कोरोनामुक्त

मुंबईतील वस्त्यांमध्ये जाऊन लसीकरण करण्याचा विचार - महापौर किशोरी पेडणेकर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा