नीला फिल्म प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडनं प्रस्तुत लोकप्रिय शो तारक मेहता का उल्टा चष्मा (tmkoc) या मालिकेची क्रेझ घराघरात आहे. याची लोकप्रियता पाहता आता या कार्यक्रमाची ॲनिमेटेड सिरीजचे प्रक्षेपण १९ एप्रिलपासून Sony Yay चॅनेलवर सुरू झाले आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा हा एकमेव भारतीय शो असेल जो एकाचवेळी लाइव्ह ॲक्शन, ॲनिमेशन आणि दोन प्रादेशिक भाषांमध्ये एकाचवेळी सुरू आहे. येत्या काही महिन्यात नीला फिल्म प्रोडक्शन्स आणखी एका प्रादेशिक भाषेत हा कार्यक्रम सादर करणार आहे.
याशिवाय ‘गोकुळधामची दुनियादारी’ आणि तेलगुमध्ये ‘तारक मामा अय्यो रामा’ या नावाने उपलब्ध आहे. गुढीपाडवा आणि उगादीच्या पवित्र मुहुर्तावर शुभारंभ झालेल्या या एपिसोडला काही तासातच युट्युब चॅनेलवर प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
दरम्यान कार्यक्रमाच्या युट्युब सबस्क्रायबरची संख्या ७० लाखापेक्षा जास्त झाली आहे. वाढत्या प्रेक्षक संख्येमुळे चॅनेल लवकरच कार्यक्रमातील गेल्या १२ वर्षातील काही उत्तम क्षण या चॅनेलवर अपलोड करणार आहे. तारक मेहता का उल्टा चष्माचे लेखक आणि निर्माते असित कुमार मोदी आहेत.
तारक मेहता का उल्टा चष्मा हा जगातील सर्वाधिक काळ दररोज प्रक्षेपित होणारा कॉमेडी शो ठरला आहे. २००८ मध्ये पहिल्यांदा प्रक्षेपित झालेला TMKOC १३व्या वर्षातही सुरू आहे. या कालावधीत त्याचे ३ हजार १०० हून अधिक एपिसोड प्रक्षेपित झाले आहेत.
हेही वाचा