Advertisement

नवाझुद्दीन सिद्दीकीचा मुंबईत नवा बंगला

बॉलिवूडमध्ये यशस्वी होण्याच्या स्वप्नासोबतच त्यानं त्याचं आणखी एक स्वप्न पूर्ण केलं आहे ते म्हणजे मुंबईत घर घेणं.

नवाझुद्दीन सिद्दीकीचा मुंबईत नवा बंगला
SHARES

मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं ते म्हणजे स्वत:चं हक्काच घर असाव. असचं स्वप्न घेऊन मुंबईत अभिनेता होण्यासाठी आलेल्या नवाझुद्दीन सिद्दीकीनं (Nawazuddin Siddiqui) हेच स्वप्न पूर्ण केलं आहे.

सुरवातीच्या काळात काम मिळत नसताना त्यानं हार मानली नाही. तर उलट जे मिळेल ते काम केले. याच मेहनतीच्या बळावर त्यानं बॉलिवूडमध्ये यश मिळवलं. बॉलिवूडमध्ये यशस्वी होण्याच्या स्वप्नासोबतच त्यानं त्याचं आणखी एक स्वप्न पूर्ण केलं आहे ते म्हणजे मुंबईत घर घेणं.

नवाझुद्दीननं मुंबईत एक आलिशान घर (Nawazuddin Luxurious Home) बनवलं आहे. महालासारख्या वाटणाऱ्या या बंगल्याचे फोटो नवाझुद्दीननं त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

काही दिवासांपूर्वीच मुंबईतील नवाझुद्दीनच्या घराचं काम पूर्ण झालं असून या त्याच्या बंगल्यापुढे एक सुंदर गार्डन देखील आहे. त्यानं नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये तो या गार्डनमध्ये एका खुर्चीवर बसून कोणतंतरी पुस्तक वाचताना दिसत आहे.

नवाझुद्दीननं या घराचं काम करून घेतना त्याच्या जुन्या घराच्या इंटीरियरची प्रेरणा घेऊन हे घरं तयार करवून घेतलं आहे. विशेष म्हणजे नवाझुद्दीनने या घराचं नाव त्याच्या वडिलांच्या आठवणीत 'नवाब' असं ठेवलं आहे.

काही दिवसांपूर्वीच नवाझुद्दीन रात अकेली हे (Raat Akeli Hai) आणि सीरियस मॅन (Serious Men) या चित्रपटात झळकला होता.हेही वाचा

नार्को क्वीन शशिकला पाटणकर यांच्या आयुष्यावर वेब सिरीज

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा