नेटफ्लिक्सचा धमाका, लवकरच घेऊन येत आहेत नऊ सिनेमे

नेटफ्लिक्स येत्या नवीन वर्षात तब्बल ९ नवीन चित्रपट घेऊन येत आहे. आनंदाची बाब म्हणजे या ९ चित्रपटांमधले २ चित्रपट हे मराठी असणार आहेत.

  • नेटफ्लिक्सचा धमाका, लवकरच घेऊन येत आहेत नऊ सिनेमे
  • नेटफ्लिक्सचा धमाका, लवकरच घेऊन येत आहेत नऊ सिनेमे
  • नेटफ्लिक्सचा धमाका, लवकरच घेऊन येत आहेत नऊ सिनेमे
  • नेटफ्लिक्सचा धमाका, लवकरच घेऊन येत आहेत नऊ सिनेमे
  • नेटफ्लिक्सचा धमाका, लवकरच घेऊन येत आहेत नऊ सिनेमे
  • नेटफ्लिक्सचा धमाका, लवकरच घेऊन येत आहेत नऊ सिनेमे
  • नेटफ्लिक्सचा धमाका, लवकरच घेऊन येत आहेत नऊ सिनेमे
  • नेटफ्लिक्सचा धमाका, लवकरच घेऊन येत आहेत नऊ सिनेमे
  • नेटफ्लिक्सचा धमाका, लवकरच घेऊन येत आहेत नऊ सिनेमे
SHARE

नेटफ्लिक्सच्या भारतीय ओरिजिनल सिरीज आणि चित्रपटांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता नेटफ्लिक्स येत्या नवीन वर्षात तब्बल ९ नवीन चित्रपट घेऊन येत आहे. आनंदाची बाब म्हणजे या ९ चित्रपटांमधले २ चित्रपट हे मराठी असणार आहेत. हे ९ सिनेमे कोणते असतील आणि त्यांचं कथानक काय असेल? याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.


१) फायरब्रँड

'फायरब्रँड' हा प्रियांका चोप्राची निर्मिती असलेला तिसरा आणि नेटफ्लिक्सचा कदाचित पहिला मराठी चित्रपट असेल. फायरब्रँड चित्रपटाचं कथानक एका महिला वकिलाच्या अवतीभोवती फिरणारं आहे. 


उषा जाधव, सचिन खेडेकर, राजेश्वरी सचदेव आणि गिरीश कुलकर्णी हे मराठी कलाकार फायरब्रँडमध्ये असतील. दिग्दर्शिका अरुणा राजे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.


२) 15th August


'15th August' ही देखील मराठी फिल्म असणार आहे. या चित्रपटात केवळ एका दिवसात घडणारं कथानक असेल. १५ ऑगस्टच्या दिवशी मुंबईतल्या एका चाळीत कशा प्रकारे स्वातंत्रदिन साजरा होतो याचीच ही गोष्ट आहे. माधुरी दीक्षितची ही पहिलीच निर्मिती असणार आहे. 


३) सोनी

‘सोनी’ चित्रपट २ तरुण महिला पोलिसांच्या आयुष्यावर आधारीत आहे. दिल्लीसारख्या ठिकाणी सोनी आणि तिची ऑफिसर कल्पना या दोघी कशा प्रकारे गुन्हेगारांना तोंड देतात. याशिवाय एक महिला पोलीस ऑफिसरचा पुरुष प्रधान वातावरणातला संघर्ष काय असतो? हे ‘सोनी’ मध्ये पहायला मिळणार आहे. 


या चित्रपटाचं दिग्दर्शन आयवन अय्यर यांनी केलं आहे. प्रतिष्ठेच्या व्हेनिस चित्रपट महोत्सवात ‘सोनी’ची निवड झाल्यानंतर चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. २०१९ च्या सुरुवातीला हा चित्रपट आपण नेटफ्लिक्सवर पाहू शकणार आहात.


४) हॉटेल मुंबई

मुंबईमधल्या २००८ च्या हल्ल्याला बळी पडलेल्या आणि त्यातून सुखरूप परतलेल्या एका व्यक्तीची गोष्ट 'हॉटेल मुंबई'मध्ये असेल. 


स्लमडॉग मिलेनियर, लायन अशा चित्रपटातून आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवलेला देव पटेल ‘हॉटेल मुंबई’ मध्ये मुख्य भूमिकेत असेल. देव पटेलसोबत अनुपम खेरसुद्धा या चित्रपटात असतील.


५) म्युझिक टीचर


म्युझिक टीचर आणि आता मोठी गायिका झालेली त्याची एकेकाळची शिष्या या दोघांभोवती भोवती ‘म्युझिक टीचर’चं कथानक फिरतं. मानव कौल या सिनेमात प्रमुख भूमिकेत असेल. सार्थक दासगुप्ता यांनी फिल्मचं दिग्दर्शन केलं आहे.

६) चॉपस्टिक्स


'चॉपस्टिक्स'ची गोष्ट एका लाजऱ्याबुजऱ्या मुलीची आहे. तिची कार चोरीला गेल्यावर ती कशा प्रकारे एका चोराशी हातमिळवणी करून मुंबईच्या गुंडाकडून कार परत मिळवते,


या प्रवासात तिच्यात कसे बदल घडतात याचं चित्रण ‘चॉपस्टिक्स’ मध्ये असेल. चॉपस्टिक्स मध्ये मिथिला पालकर, अभय देओल आणि विजय राज यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.


७) अपस्टार्ट


तीन मित्र, त्यांची मैत्री आणि त्यांच्या स्टार्टअपची कथा 'अपस्टार्ट'मध्ये पाहायला मिळेल. मोठं स्टार्टअप, मोठा पैसा पण मैत्री की स्वप्न अशा पेचात हे तरूण अडकलेले आहेत, असं या कथानकात पाहायला मिळेल. उदय सिंग पवार या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.


८) बुलबुल


एका दीर्घ काळानंतर गावी परतणारा तरुण, त्याचा भाऊ आणि त्याच्या भावाची पत्नी यांची गोष्ट 'बुलबुल'मध्ये असेल. याची कथा फक्त एका कुटुंबापुरती नाही, तर गावातल्या माणसांचा गूढ मृत्यू आणि गावकऱ्यांच्या अंधश्रद्धा या कथेच्या मध्यभागी असेल. अनुष्का शर्माची क्लीन स्लेट फिल्म्स 'बुलबुल'ची निर्मिती करणार आहे.


९) कोबाल्ट ब्ल्यू

सचिन कुंडलकर यांची गाजलेली कादंबरी ‘कोबाल्ट ब्ल्यू’ वर आधारित हा हिंदी सिनेमा असणार आहे. चित्रपटाचं कथानक हे एकाच मुलाच्या प्रेमात पडलेल्या भावाबहिणींच्या आयुष्यावर आधारित आहे.


अशा या विचित्र परिस्थितीत मराठी कुटुंबात काय घडतं हे या सिनेमातमध्ये असेल. सचिन कुंडलकर स्वतः कोबाल्ट ब्ल्यूचं दिग्दर्शन करणार आहेत. २०१९ च्या शेवटी सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.


हेही वाचा

प्रियंकाची व्यवहारीक चतुराई

'मी पण सचिन' म्हणत १ फेब्रुवारीला भेटणार स्वप्नील!
संबंधित विषय
ताज्या बातम्या