Advertisement

'मी पण सचिन' म्हणत १ फेब्रुवारीला भेटणार स्वप्नील!


'मी पण सचिन' म्हणत १ फेब्रुवारीला भेटणार स्वप्नील!
SHARES

सचिन... हे नाव उच्चारताच किंवा मनात येतात, सर्वात आधी डोळ्यांसमोर येतो तो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर! भारतातील लाखो क्रिकेटवीरांसाठी सचिन एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. भारताच्या प्रत्येक गल्लीबोळात आपल्याला असे अनेक महत्वाकांक्षी सचिन दिसून येतील, ज्यांनी सचिनला आदर्श ठेवत मैदानात रणशिंग फुंकलं आहे. असाच एक सचिन 'मी पण सचिन' असं म्हणत पडद्यावर झळकणार आहे.


चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

सध्या 'मुंबई पुणे मुंबई ३' या चित्रपटामुळे चर्चेत असलेला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी या चित्रपटात सचिनच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच 'मी पण सचिन' या  चित्रपटाचं पोस्टर सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आलं. पोस्टरवर  स्वप्नील जोशी क्रिकेट किटमध्ये म्हणजेच क्रिकेट खेळताना वापरलं जाणारं हेल्मेट घालून दिसत आहे. याच पोस्टर वर 'डोन्ट स्टॅाप चेझींग युवर ड्रीम्स'a म्हणजेच आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणे थांबवू नका अशा आशयाची टॅग लाईनसुद्धा आहे.


काय आहे या पोस्टरमध्ये?

गणराज असोसिएटने आतापर्यंत अनेक चित्रपटांची प्रस्तुती आणि निर्मिती केली आहे ज्यामध्ये 'मी पण सचिन' या चित्रपटाचा देखील समावेश होत आहे. विशेष म्हणजे, मराठी रॅपर किंग जेडी उर्फ श्रेयश जाधव यात लेखक आणि दिग्दर्शक अश्या दुहेरी भूमिकेतून लोकांसमोर येत आहे. पोस्टरमध्ये स्वप्नील जोशी आपल्याला एका दमदार क्रिकेटपटूसारखा दिसत असून, पोस्टरवरील टॅग लाईनसुद्धा प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारी आहे.  


१ फेब्रुवारी होणार प्रदर्शित

पोस्टर पाहिल्यावर हा चित्रपट भविष्यात सचिन होऊ इच्छिणाऱ्या एका महत्वाकांक्षी क्रिकेटपटूवर आधारित आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. शिवाय स्वप्नील जोशी यात नेमकी कोणती भूमिका साकारणार हे देखील गुपित आहे. हा चित्रपट येत्या नववर्षात १ फेब्रुवारी २०१९ रोजी आपल्या प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा भारतातील क्रिकेटवेड्या तरुणाईंचं भावविश्व उलगडणारा ठरेल अशी आशा आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा