'गर्ल्स हॉस्टेल'मधल्या गूढ भयाची कथा!

Mumbai
'गर्ल्स हॉस्टेल'मधल्या गूढ भयाची कथा!
'गर्ल्स हॉस्टेल'मधल्या गूढ भयाची कथा!
'गर्ल्स हॉस्टेल'मधल्या गूढ भयाची कथा!
See all
मुंबई  -  

जेव्हा एखाद्या अनाकलनीय गूढ गोष्टीमुळे मनात धोक्याची जाणीव होते, तेव्हा अनुभवास येणारी ती भावना आपल्या मनात एक विचित्र प्रकारचं भय निर्माण करते. तसं पाहिलं, तर हे भय बऱ्याच वेळा प्रसंगानुरूपही असतं. त्यामुळे ते कोणत्या गोष्टीचं वाटेल, हे काही सांगता येत नाही. भयकथा ऐकताना आजवर अनेक वेळा आपण हॉस्टेलमधली एखादी गूढ भयकथा ऐकतोच. जे स्वतः हॉस्टेल मध्ये राहतात किंवा ज्यांनी हॉस्टेलमधलं जीवन अनुभवलंय, त्यांना असे किस्से चांगलेच माहीत असतात. रात्रीच्या मित्र मैत्रिणींच्या गप्पांच्या ओघात हे किस्से आणखी रंगवून सांगितले जातात. अशाच अनाकलनीय भयाची चाहूल सोबत घेऊन 'गर्ल्स हॉस्टेल...कोणीतरी आहे तिथे' ही नवीन मालिका १० जुलै पासून सोमवार ते शुक्रवार रात्री १० वा. 'झी युवा' आणत आहे. 'गर्ल्स हॉस्टेल' ही मालिका मुंबईत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आलेल्या ९ मुलींची आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका भयावह घटनेची गोष्ट आहे. एक अशी घटना, ज्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्यच हादरुन जातं.

दिवसरात्र जागणारं आणि गर्दीनं ओसंडून वाहणारं मुंबई शहर महिलांसाठी अजूनही म्हणावं तसं सुरक्षित नाही. अशा परिस्थितीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी सारा, प्रियांका, तन्वी, मालती, वल्लरी, ध्यानलक्ष्मी, सागरिका, नेहा आणि वनिता या पुणे, नाशिक, पंढरपूर, मराठवाडा अशा व इतर वेगवेगळ्या शहरांतून आलेल्या मुली 'सावित्री गर्ल्स हॉस्टेल'मध्ये रूममेट्स म्हणून राहत आहेत. रोजच्या आयुष्यातला संघर्ष करत असतानाच होस्टेलच्या भिंतीच्या आत मात्र त्यांना प्रचंड सुरक्षित वाटतं. 'सावित्री गर्ल्स हॉस्टेल' मधल्या या मुलींना सगळ्यात मोठा आधार आहे तो एकमेकींचा, एकमेकांबरोबर असण्याचा. त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात सुरक्षित हक्काची जागा आहे, त्यांचं 'सावित्री गर्ल्स हॉस्टेल'. पण याच त्यांच्या सावित्री गर्ल्स हॉस्टेलच्या सुरक्षित जगात अतिशय भयानक घटना घडते, ज्यामुळे या मुलींच्या आयुष्यातील धमाल मस्ती संपून त्याची जागा थरकाप उडवणारी भीती घेते. गूढ घटनांची साखळी वाढू लागते आणि त्यानंतर सुरु होतं एक अनाकलनीय घटनांचं भयंकर चक्र! या सर्व मुली एक एक करुन या चक्रात गुरफटल्या जातात. प्रत्येकवेळी 'कोणीतरी आहे तिथे' ही भावना बळावू लागते आणि हॉस्टेलमध्ये एक भीतीच सावट पसरू लागतं.

'सोमिल क्रिएशन'ची निर्मिती असलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन अमोल बिडकर यांनी केलं आहे. 'गर्ल्स हॉस्टेल, कोणीतरी आहे तिथे...' येत्या १० जुलै पासून सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता झी युवावर प्रदर्शित होत आहे.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.