Advertisement

स्त्री समस्येवर भाष्य करणारा 'ती आणि इतर'...


स्त्री समस्येवर भाष्य करणारा 'ती आणि इतर'...
SHARES

'सायलेन्स इस नॉट अन ऑप्शन...' (गप्पं बसणं हा काही पर्याय नाही होऊ शकत) या मथळ्याला अधोरेखित करणारा 'ती आणि इतर' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. हिंदीचे प्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहालानी दिग्दर्शित या आगामी मराठी चित्रपटात सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका आहे. या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकताच पोस्टर आणि ट्रेलर लाँच करण्यात आला. या सिनेमाचा ट्रेलर पहिला असता 'ती आणि इतर' या शीर्षकाचा अर्थबोध होतो. एका खोलीत बसलेल्या लोकांना येत असलेला 'ती' चा आवाज, आणि त्या आवाजामुळे प्रत्येकाच्या मनात उठणारे वादळ या ट्रेलरमध्ये दिसून येते. एका अज्ञात स्त्रीवर बेतलेल्या प्रसंगावर, ही माणसे आपापल्या परीने कसा विचार करतात, हे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.


या सिनेमात अमृता सुभाष, आविष्कार दारव्हेकर, भूषण प्रधान, प्रिया मराठे, सुमन पटेल आणि गणेश यादव हे कलाकार देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ट्रेलरसोबतच या सिनेमाचा पोस्टर देखील 'स्त्री' विषयक समस्येवर भाष्य करणारा आहे. अर्धसत्य, आक्रोश, तमस, द्रोहकाल यासारखे वास्तववादी विषय आपल्या चित्रपटाद्वारे मांडणारे प्रगल्भ दिग्दर्शक गोविंद निहालानी या सिनेमाच्या माध्यमातून मराठीत पदार्पण करत असल्यामुळे, मनाला चटका लावून जाणाऱ्या त्यांच्या समाजाभिमुख शैलीचा मराठी प्रेक्षकांना अनुभव घेता येणार आहे. लेखिका मंजुळा पद्मनाभन यांच्या इंग्रजी नाटक 'लाईटस् आऊट' वर आधारित असलेला हा सिनेमा येत्या २१ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा