Advertisement

'गर्ल्स हॉस्टेल'मधील गूढ घटनांची तीव्रता वाढणार


'गर्ल्स हॉस्टेल'मधील गूढ घटनांची तीव्रता वाढणार
SHARES

सासू-सूनेच्या मालिकेपेक्षा वेगळी आणि गूढ कथा घेऊन आलेली मालिका 'गर्ल्स हॉस्टेल' ला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. 'गर्ल्स हॉस्टेल'मध्ये आतापर्यंत घडलेल्या अनेक घटनांनी मालिकेची उत्कंठा वाढवलेली आहे. या मालिकेत सारा, प्रियांका, तन्वी, मालती, वल्लरी, ध्यानलक्ष्मी, सागरिका, नेहा आणि वनिता या पुणे, नाशिक, पंढरपूर, मराठवाडा अशा व इतर वेगवेगळ्या शहरांतून आलेल्या मुली 'सावित्री गर्ल्स हॉस्टेल'मध्ये रूममेट्स म्हणून धमाल मस्ती आणि लुटुपुटीची भांडण करूनसुद्धा मजेत राहत होत्या. पहिल्याच भागात सर्वांच्या लाडक्या साराचा अनपेक्षितरित्या मृत्यू होतो आणि हॉस्टेलमध्ये अनेक भीतीदायक घटना घडू लागतात. 

 


पण आता या गूढ घटनांची तीव्रता अधिक गडद होणार आहे. मालिकेत अंगावर शहारे आणणाऱ्या, काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अकल्पित घटना अनुभवायला मिळणार आहे. २० सप्टेंबरच्या सर्वपित्री अमावस्येनिमित्त दाखवण्यात येणाऱ्या महा एपिसोडपासून मालिका वेगळेच वळण घेणार आहे.

'गर्ल्स हॉस्टेल...कोणीतरी आहे तिथे' या मालिकेत नावाप्रमाणेच सर्वपित्री अमावस्येच्या गूढ रात्री... कोणीतरी' दिसणार आहे. झी युवा वाहिनीवर रात्री १० हा महा एपिसोड पाहायला विसरु नका. 



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा