Advertisement

तितिक्षाचं असंही रूप


तितिक्षाचं असंही रूप
SHARES

कलर्स मराठीवरील 'सरस्वती' या मालिकेमध्ये सरस्वतीच्या मृत्यूनंतर वाड्यामध्ये बऱ्याच घटना घडल्या. ज्याला प्रेक्षक देखील साक्षीदार आहेत. त्यानंतर सरस्वती सारख्या दिसणाऱ्या मुलीला म्हणजेच दुर्गाला विद्युल आणि भुजंगने वाड्यामध्ये आणणं, सरस्वतीचं मालिकेमध्ये परतणे, राघवचे दुर्गालाच सरस्वती समजणं, हे सगळं घडत असतानाच सरस्वतीला असणारा आजार राघवला कळणे या सगळ्याच गोष्टी खूप आश्चर्यजनक होत्या. पण आता या मालिकेमध्ये अजून एक रंजक वळण येणार आहे.


या मालिकेत पुढे काय?

आता या मालिकेमध्ये दुर्गा सरस्वतीचा काटा कसा काढेल? राघवला दुर्गाच्या मनामध्ये काय आहे हे कळेल का? सरस्वतीला हे कळल्यावर ती कशी या संकंटाला सामोरे जाईल या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना पुढील भागांत मिळणार आहे.


एक कलाकार म्हणून माझी वेगवेगळी रूपं, भूमिकेमधील शेड्स दाखवण्याची उत्तम संधी मला सरस्वती या मालिकेने अनेकदा दिली. आणि मी खूप भाग्यवान आहे की, हीच मालिका करताना आता मला नकारात्मक भूमिका करण्याची संधी मिळत आहे, डबल रोल आणि आता ही संधी नक्कीच आव्हानात्मक आहे. पण मी नक्कीच ही जबाबदारी पूर्णपणे निभावण्याचा मनापासून प्रयत्न करेन. 
- तितिक्षा तावडे, अभिनेत्री

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा