Advertisement

'कुली नंबर-१'सह हे ९ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार

शुक्रवारी तीन मोठ्या हिंदी चित्रपटांसह एकूण ९ चित्रपटांनी ओटीटी रिलीजची घोषणा केली आहे. यात वरुण धवनचा 'कुली नंबर १', राजकुमार रावचा 'छलांग' आणि भूमी पेडणेकरच्या 'दुर्गावती'चा समावेश आहे.

SHARES
01/9
'कुली नंबर-१'सह हे ९ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार
हलाल लव्ह स्टोरी हा जकारिया मोहम्मद दिग्दर्शित आगामी मल्याळम कॉमेडी चित्रपट आहे. पार्वती थिरुवोथु यांच्यासह मुख्य भूमिकेत इंद्रजीत सुकुमारन, जोजू जॉर्ज, शराफ यू धीन, ग्रेस अँटनी आणि सौबिन शाहिर आहेत.
02/9
'कुली नंबर-१'सह हे ९ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार
भीमा सेना नलामहराजा हा कन्नड चित्रपटाचा रिमेक आहे. याचं दिग्दर्शन कार्तिक सारागुर यांनी केलं आहे. यात अरविंद अय्यर, आरोही नारायण, प्रियांका थिमेश, अच्युत कुमार आणि आद्य मुख्य भूमिकेत आहेत.
03/9
'कुली नंबर-१'सह हे ९ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार
सोराराय पोटू हा सुधी कोंगारा दिग्दर्शित आगामी तामिळ भाषेचा रिमेक आहे. अपर्णा बालामुरली, परेश रावल आणि मोहन बाबू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती सूर्याच्या 2 डी एन्टरटेन्मेंट आणि सह-निर्मित गुनीत मोंगा यांच्या सिख्या एंटरटेन्मेंटनं केली आहे. हा चित्रपट एअर डेक्कनचे संस्थापक कॅप्टन जी. आर. गोपीनाथ यांच्या जीवनावर लिहिलेल्या “सिंपली फ्लाय” पुस्तकाची काल्पनिक आवृत्ती आहे.
04/9
'कुली नंबर-१'सह हे ९ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार
राजकुमार राव आणि नुसरत भरुचा स्टारर 'छलांग' १३ नोव्हेंबरपासून स्ट्रीम होईल. चित्रपटात राजकुमार माँटी नावाच्या एका पीटी टीचरच्या रोलमध्ये आहे. तर नुसरत त्याची प्रेयसी नीलूच्या भूमीकेत आहे. या चित्रपटाचे निर्माते अजय देवगन, लव रंजन आणि अंकुर गर्ग आहे. तसंच, हंसल मेहतानं हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हंसल मेहतासोबत राजकुमारचा पाचवा चित्रपट आहे. यापूर्वी दोघांनी शाहिद, सिटीलाइट्स, अलीगड आणि ओमेर्टामध्ये काम केलं आहे.
05/9
'कुली नंबर-१'सह हे ९ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार
माने नंबर १३ एक आगामी हॉरर थ्रिलर आहे. ज्याचे दिग्दर्शन विवी काथिरेसन यांनी केलं आहे. कृष्ण चैतन्य यांच्या श्री स्वर्णलता प्रोडक्शन्स निर्मित या चित्रपटात वर्षा बोलम्मा, ऐश्वर्या गौडा, प्रवीण प्रेम, चेतन गंधर्व, रामना आणि संजीव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
06/9
'कुली नंबर-१'सह हे ९ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार
मिडल क्लास मेलोडिज हा आनंद देवेराकोंडा आणि वर्षा बोलम्मा अभिनीत चित्रपट आहे. एका खेड्यातील मध्यमवर्गाचे जन्मजात जीवन दर्शवणारी एक विनोदपूर्ण कथा आहे. जिथे एक तरुण माणूस एका शहरात हॉटेल घ्यायचं स्वप्न पाहत आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन विनोद अनंतोजू यांनी केलं आहे.
07/9
'कुली नंबर-१'सह हे ९ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार
अशोक दिग्दर्शित आणि भूमी पेडणेकर अभिनीत, दुर्गावती ही एक थरारक आणि भितीदायक कथा आहे. जी एका निर्दोष शासकीय अधिकाऱ्याची कहाणी सांगते ज्याला शक्तिशाली सैन्यासह मोठ्या षडयंत्रात बळी पाडले जाते. टी-सीरिज आणि केप ऑफ गुड फिल्मस् या चित्रपटाची प्रस्तुती केली गेली आहे. तो अबंडंटिया एंटरटेनमेंट निर्मिती आहे.
08/9
'कुली नंबर-१'सह हे ९ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार
मारा हा एक आगामी तामिळ भाषेतील चित्रपट आहे. रोमँटिक अशी या चित्रपटाची कथा आहे. ज्याचे दिग्दर्शन दिलीप कुमार यांनी केलं आहे. प्रितोड चक्रवर्ती आणि प्रमोद फिल्म्सच्या श्रुती नल्लाप्पा निर्मित. या चित्रपटात माधवन आणि श्रद्धा श्रीनाथ मुख्य भूमिकेत आहेत.
09/9
'कुली नंबर-१'सह हे ९ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार
डेविड धवनच्या डायरेक्शनमध्ये बनलेला कुली नंबर १ हा चित्रपट १९९५ मध्ये आलेल्या गोविंदा आणि करिश्मा कपूर स्टारर चित्रपटाचा रीमेक आहे. या चित्रपटाच वरुणसोबत सारा अली खान आणि परेश रावल महत्वाच्या भूमीकेत आहेत. हा चित्रपट आधी १ मे २०२० ला रिलीज होणार होता, पण कोरोनामुळे रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा