ओंकार शिंदे, प्रार्थना बेहेरे जोडीचा 'तांडव'


SHARE

प्रार्थना बेहेरेचा नवीन लूकआपल्याला 'अनान' या सिनेमात लवकरच पाहायला मिळणार आहे. आता याच सिनेमात आपल्याला ओंकार शिंदे आणि प्रार्थना बेहेरे या नवीन दमदार जोडीचा नृत्याविष्कारही 'तांडव' द्वारे पाहायला मिळणार आहे. 'अनान' या चित्रपटातील भगवान शंकरांच्या द्विभूज स्वरुपाचे दर्शन घडवणारे 'तांडव' नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आणि त्यातच या जोडीचे 'तांडव नृत्य' आपल्याला पाहायला मिळत आहे.
शिव रुद्र आणि शिव नटराज असे तांडवाचे दोन प्रकार म्हणजेच भगवान शिव शंकरांचे रौद्ररूपाचे प्रतीक असलेले शिव रुद्र तांडव आणि त्यांच्या आनंदी क्षणातील सौम्य रूपाचे प्रतीक असलेले शिव नटराज तांडव आपल्याला अनानच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहेत.'तांडव'हे गाणं ही दिग्दर्शक राजेश कुष्टे यांनी लिहिले असून सौरभ–दुर्गेश ह्या संगीतकार जोडीने ते संगीतबद्ध केलेय.संबंधित विषय
ताज्या बातम्या