Advertisement

कसा असेल 'प्रार्थना बेहरे'चा नवीन लूक?


SHARES

प्रार्थना बेहेरेचा न्यू लुक पाहायला मिळणाऱ्या 'अनान' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक मुंबईत नुकत्याच झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात लाँच करण्यात आले. 'रोहन थिएटर्स'चे रौनक भाटिया आणि हेमंत भाटिया हे निर्माते, दिग्दर्शक राजेश कुष्टे त्याचबरोबर ओंकार शिंदे, सुखदा खांडकेकर, सुयोग गोरे, यतिन कार्येकर, राजेंद्र शिसतकर, उदय सबनीस, उदय नेने हे सिनेमातील कलाकार यावेळी उपस्थित होते. तर, इंडस्ट्रीतील इतर अनेक नामवंत कलाकारांनी आवर्जून या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली.'अनान' चित्रपटाच्या निमित्ताने एक आगळावेगळा विषय आपल्या भेटीला येणार असल्याची झलक दाखवणारा आकर्षक टीझर नुकताच लाँच झाला असून या चित्रपटातून एका नवीन विषयाने मराठीत प्रवेश केलेला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला लाभलेल्या सौरभ - दुर्गेश या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेल्या 'गंधी सुगंधी', 'एक सूर्य तू', 'काहे तू प्रित जगायी' यांसारख्या एकापेक्षा एक सरस आणि विविध रागांनी रंगलेल्या गाण्यांना सोनू निगम, आनंदी जोशी, रवींद्र साठे व सौरभ शेट्ये यांचा आवाज लाभला आहे. 'अनान' चित्रपटातील एकूण 5 गाण्यांपैकी 3 गाणी यावेळी लाँच करण्यात आली.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा