Advertisement

सॅमसंगमुळे बिग बी हैराण


सॅमसंगमुळे बिग बी हैराण
SHARES

मुंबई - बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी सॅमसंगवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. अमिताभकडे सॅमसंगचा गॅलेक्सी नोट 7 हा स्मार्टफोन आहे. सदोष बॅटरीमुळे गेल्या काही दिवसात हा फोन पेट घेत आहे. त्यामुळे अमिताभने ट्विटवरुन सॅमसंग कंपनीकडे दाद मागितली आहे.

अमिताभ बच्चन वापरत असलेल्या सॅमसंग गॅलेक्सी नोट 7 ची बॅटरी फक्त 60 टक्क्यांपर्यंत चार्ज होत आहे. त्यामुळे ती 100 टक्के कधी चार्ज करता येणार असा सवाल अमिताभने विचारला आहे. तसंच लवकर प्रतिसाद देण्याचीही विनंतीही केली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा