बल्ले बल्ले... सैराट लवकरच पंजाबीत

 Pali Hill
बल्ले बल्ले... सैराट लवकरच पंजाबीत

मुंबई - सैराटच्या झिंगाटनं अनेकांना याड लावलं. सैराटनं आतापर्यंत सर्व रेकॉर्ड मोडलेत. तेलगू, तमिळ, कन्नड, मळ्यालम या भाषेत सैराट सिनेमा येणार आहे. सैराट सिनेमाच्या सोशल पेजवर सैराटच्या पंजाबी सिनेमाचं पोस्टर लाँच करण्यात आलंय. पुढील वर्षी 14 जुलै 2017ला झी स्टुडियो प्रस्तुत आणि व्हाईट हिल प्रॉडक्शन प्रस्तुत सैराट पंजाबीत प्रदर्शित होणाराय. पंजाबी रिमेकचे दिग्दर्शन पंकज भत्रा करणार आहेत. परंतु या चित्रपटामधील प्रमुख भूमिका म्हणजेच आर्ची-परशाच्या जागी कोण असणार हे जाणून घेण्यासाठी अजूनतरी प्रतीक्षा करावी लागणाराय.

Loading Comments