Advertisement

पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘पाटील’


पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘पाटील’
SHARES

चित्रपट बनवण्यापेक्षा तो प्रदर्शित करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि खर्चही करावा लागतो. या कारणामुळे कित्येक चित्रपट प्रदर्शनापासून वंचित राहतात, पण प्रदर्शित झालेला एखादा चित्रपट काही कारणांमुळे पुर्नप्रदर्शित केला जातो तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावतात. ‘पाटील’ हा संघर्षमय मराठी चित्रपट राज्यातल्या बहुतांश भागात चित्रपट प्रदर्शित झाला, तर काही ठिकाणी होऊ शकला नाही. येत्या २१ डिसेंबरला हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार आहे.


कर्तव्य आणि प्रेम

प्रेम आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या दोन्ही गोष्टींचा समतोल साधता आला की, माणूस सुखी होतो. कर्तव्य आणि प्रेम या दोन गोष्टींची सांगड घालत या चित्रपटात शीर्षक व्यक्तिरेखा असलेल्या शिवाजी पाटील यांचा भूतकाळ, संघर्ष, दुःख, अपमान आणि त्यानंतर परिस्थितीसमोर हार न मानता धीराने उत्तर देण्याची जिद्द समोर येणार आहे. प्रेम, कर्तव्य यांच्यात समतोल साधू पाहणाऱ्या शिवाजीने हाती घेतलेलं ध्येय तो पूर्णत्वास नेईल का? या प्रश्नाचं उत्तर ‘पाटील’मध्ये आहे.


पाहुणे कलाकार

संतोष मिजगर लिखित-दिग्दर्शित ‘पाटील’ चित्रपटात एस. आर. एम. एलियन, शिवाजी लोटन, वर्षा दांदळे,  भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे, यश आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. विशेष भूमिकेत डॉ. जगदिश पाटील (कोकण आयुक्त) आणि पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत ‘झी नेटवर्क एस्सेल व्हीजनचे चेअरमन डॉ. सुभाषचंद्र दिसणार आहेत.


दिग्दर्शन संतोष मिजगर यांचं

या चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन संतोष मिजगर यांचं आहे. निलेश गावंड, मनीष शिर्के यांचं संकलन, तर छायांकन सुधाकर रेड्डी यकंटी,  राजा यांचं आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केलं आहे. वेशभूषा पृथा मांजरेकर, ज्योती मुलगीर यांनी केली आहे. ध्वनी अनिरुद्ध काळे, तर व्हीएफएक्सची जबाबदारी प्रशांत मेहता यांनी सांभाळली असून, कला दिग्दर्शन सुरेश पिल्ले यांनी केलं आहे.हेही वाचा - 

प्रीमियर वर्षा-किशोरीच्या 'पियानो फॉर सेल'चा

हे आहे प्रिया-उमेशच्या 'गोड बातमी'तील सिक्रेट
संबंधित विषय