Advertisement

हे आहे प्रिया-उमेशच्या 'गोड बातमी'तील सिक्रेट

प्रिया-उमेश रसिकांसाठी एक नवं नाटक घेऊन येत आहेत. 'दादा, एक गुड न्यूज आहे' असं या नाटकाचं शीर्षक आहे. आज शेअर केलेल्या पोस्टसोबत प्रियाने 'दादा, एक गुड न्यूज आहे' या नाटकात मुख्य भूमिका साकारणाऱ्या उमेश आणि ऋता दुर्गुळे यांचा फोटो असलेलं नाटकाचं पोस्टरही शेअर केलं आहे.

हे आहे प्रिया-उमेशच्या 'गोड बातमी'तील सिक्रेट
SHARES

तर ही आहे गुड न्यूज! सोनल प्रोडक्शन्ससह आमची पहिली निर्मिती. खूप मनापासून, प्रेमाने जपलेली आणि वाढवलेली ही पहिली कलाकृती लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. आजपर्यंत अभिनेते म्हणून तुम्ही आमच्यावर खूप प्रेम केलं, तसंच आमच्या या नव्या प्रवासाला सुध्दा तुमचं प्रेम आणि आशीर्वाद मिळू देत', अशा आशयाची पोस्ट शेअर करत अभिनेत्री प्रिया बापट-कामतने मागच्या आठवड्यात टाकलेल्या 'एक गुड न्यूज आहे' या पोस्टमागील सिक्रेट ओपन केलं आहे.


सिक्रेट ओपन

मागच्या आठवड्यात प्रियाने 'एक गुड न्यूज आहे' या आशयाची पोस्ट शेअर करत पती उमेश कामतसोबतचा आपला एक रोमँटिक फोटो शेअर केला होता. त्यामुळे प्रियाकडे 'गोड बातमी' म्हणजे 'नवा पाहुणा' येणार की काय? या चर्चेला उधाण आलं होतं. पण त्या बातमीत पुढे कोणताच उल्लेख नसल्याने ही थोडीशी गंमतही असू शकते याचा अंदाजही अनेकांना आला होता. आता या बातमीतील सिक्रेट ओपन झालं आहे. ही गोड बातमी म्हणजे प्रिया-उमेशच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये तयार झालेलं एक नवं कोरं नाटक असल्याचं आज घोषित करण्यात आलं आहे.


विश्वासू नात्याची गोष्ट

प्रिया-उमेश रसिकांसाठी एक नवं नाटक घेऊन येत आहेत. 'दादा, एक गुड न्यूज आहे' असं या नाटकाचं शीर्षक आहे. आज शेअर केलेल्या पोस्टसोबत प्रियाने 'दादा, एक गुड न्यूज आहे' या नाटकात मुख्य भूमिका साकारणाऱ्या उमेश आणि ऋता दुर्गुळे यांचा फोटो असलेलं नाटकाचं पोस्टरही शेअर केलं आहे. बहीण भावाच्या प्रेमळ आणि विश्वासू नात्याची गोष्ट नाटकात पाहायला मिळेल. या नाटकात उमेश आणि ऋता भाऊ-बहिणीची भूमिका साकारत आहेत. 


जीवापाड प्रेम करणारी बहीण 

उमेश या नाटकामध्ये एक साधं नॉर्मल आयुष्य जगणारा, खंबीर, कर्तव्याची जाण असलेला आणि बहिणीवर नितांत प्रेम करणाऱ्या भावाची भूमिका साकारत असून, ऋता ही कॉलेजला जाणारी, आयुष्य एन्जॉय करणारी आणि भावावर जीवापाड प्रेम करणारी बहीण साकारत आहे. ऋताचे हे रंगभूमीवरील पहिलंच व्यासायिक नाटक आहे. सोनल प्रोडक्शन निर्मित आणि कल्याणी पाठारे लिखित या नाटकाचं दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केली असून, नंदू कदम या नाटकाचे निर्माते आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीताची धुरा ओंकार पाटील यांनी सांभाळली आहे. आरती मोरे, ऋषी मनोहर आणि जयंत घाटे या कलाकारांचाही या नाटकात समावेश आहे.


पहिलंवहिलं नाटक

प्रिया मागोमाग उमेशनेही हेच पोस्टर शेअर करत नवीन फेसबुकवर आपली पोस्ट टाकली आहे. ज्यात 'दादा, एक गुड न्यूज आहे. लवकरच घेऊन येतोय, सोनल प्रोडक्शन्ससह आमचं पहिलंवहिलं नाटक! खूप मनापासून केलेली ही कलाकृती तुमच्यापर्यंत घेऊन येताना खूप आनंद होतोय. एक नवा विषय, एक नवीन प्रवास पण यात आमचे अनेक जवळचे मित्र जोडले गेले आहेत. कलाकार म्हणून माझ्यासाठी हा अनुभव नवीन काही शिकवणारा आणि जुन्या गोष्टी जपणारा आहे. आजपर्यंत मला दिलंत तसंच भरभरून प्रेम आमच्या ह्या नाटकालाही द्याल अशी आशा करतो. शुभारंभाचा प्रयोग आणि इतर अपडेट्स साठी फॉलो करा', असं उमेशने म्हटलं आहे.हेही वाचा - 

'बेफिकर' मितालीची सुयोगसोबत जमली जोडी!

आई-मुलीच्या नात्याची मधुर कथा
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा