मुंबई - उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करू देणार नाही, असा निर्धार मनसेने घेतला आहे. त्यामुळे मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांना मुंबई पोलिसांनी १४९ कलमाअंतर्गत नोटीस बजावली आहे. सध्या मुंबईत अनेक पाकिस्तानी कलाकार चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी ४८ तासांच्या आत मायदेशी परत जा, अन्यथा जिथे काम करत असाल तिथे घुसून मारू, असा इशारा खोपकर यांनी दिला होता. त्यामुळे पोलीसांनी त्यांना ही नोटीस बजावलीय.